Wednesday, April 23, 2025
Home बॉलीवूड केवळ अभिनेत्रीच नाही, तर ‘हे’ कलाकारही ठरले आहेत कास्टिंग काउचचे बळी, ‘या’ अभिनेत्यांनी मांडली उघडपणे व्यथा

केवळ अभिनेत्रीच नाही, तर ‘हे’ कलाकारही ठरले आहेत कास्टिंग काउचचे बळी, ‘या’ अभिनेत्यांनी मांडली उघडपणे व्यथा

अभिनयाच्या धमाल दुनियेत अनेक स्टार्स हिरो बनण्याचे स्वप्न घेऊन येतात आणि पुढे जाण्यासाठी संघर्ष करतात. मात्र, अभिनेते आणि अभिनेत्रींना त्यांचे करिअर यशस्वी करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आणि अनेक नकारांना तोंड द्यावे लागते. त्याचबरोबर अनेक सेलेब्सनी इंडस्ट्रीचे धक्कादायक सत्य जगासमोर आणले आहे, त्यातील एक सत्य कास्टिंग काउच आहे. अनेकदा अभिनेत्री कास्टिंग काउचला बळी पडल्याचा खुलासा इंडस्ट्रीमध्ये करताना दिसल्या आहेत, ज्यानंतर त्या अभिनेत्रींना लोकांचा पाठिंबा मिळतो, पण केवळ अभिनेत्रीच नाही, तर अभिनेत्यांनाही या त्रासातून जावे लागले आहे. इंडस्ट्रीमध्ये असे काही कलाकार आहेत ज्यांना कास्टिंग काउचचा सामना करावा लागला आहे. चला जाणून घेऊया त्या कलाकारांबद्दल ज्यांना कास्टिंग काउचचा  सहन करावा लागला आहे.

या यादीत प्रथम राजीव खंडेलवाल यांच्याबद्दल बोलूया. राजीव बॉलीवूडमधील उत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने अनेक चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना प्रभावित केले आहे. अलीकडेच राजीवने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, सुरुवातीच्या काळात त्याला कास्टिंग काउचचे बळी व्हावे लागले होते. राजीवने आपल्या लेटेस्ट मुलाखतीत सांगितले की, “महिला अनेकदा म्हणतात की, त्या कास्टिंग काउचला बळी पडल्या आहेत आणि त्यांना ते आतून गलिच्छ वाटते. अभिनेत्रीला लोकांचा पाठिंबा मिळतो, पण हे केवळ महिलांसाेबतच नाही, तर पुरुषांसाेबतही हाेते.” कास्टिंग काउचचा अनुभव सांगताना अभिनेत्याने सांगितले होते की,” जेव्हा त्याला त्याचा सामना करावा लागला तेव्हा त्याने दिग्दर्शकाला शिवीगाळ करून आपला राग काढला.”

या यादीत पुढचं नाव आहे बॉलिवूड अभिनेता हर्षवर्धन राणेचं. हर्षवर्धनने एकदा खुलासा केला होता की, ‘त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला दिग्दर्शकाने त्याला पॅंट काढण्यास सांगितले होते, परंतु अभिनेत्याने नकार दिला होता, ज्यानंतर त्याला कास्टिंग काउचला सामोरे जावे लागले होते.’

या यादीत बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंगचाही समावेश आहे. कास्टिंग काउचबद्दलचा अनुभव सांगताना अभिनेत्याने सांगितले की, ‘एका मुलाने त्याला एका अनोळखी ठिकाणी बोलावले आणि विचारले की, तो एक कठोर कामगार आहे की एक हुशार कामगार आहे? करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात रणवीरला जवळपास तीन वर्षे अशा अनेक घटनांना सामोरे जावे लागले.

या यादीत आयुष्मान खुराना याचा देखील समावेश आहे. आयुष्मानने खुलासा केला होता की, त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला कास्टिंग डायरेक्टरने त्याला मुख्य भूमिकेच्या बदल्यात त्याचे प्रायव्हेट पार्ट दाखवण्यास सांगितले होते, परंतु अभिनेत्याने स्पष्टपणे नकार दिला आणि तेथून निघून गेला.

अभिनेता करणवीर बोहरा देखील कास्टिंग काउचचा बळी ठरला आहे. करणवीरने कास्टिंग काउचचा खुलासा केला आणि सांगितले की, एका कास्टिंग डायरेक्टरने त्याला घाणेरड्या पद्धतीने स्पर्श केला होता, ज्यानंतर त्याने त्या कास्टिंग डायरेक्टरसोबत काम करण्यास नकार दिला.(who faced casting couch ayushmann khurrana harshvardhan karan tacker rajeev khandelwal ranveer singh )

अधिक वाचा-
राहुल शर्मासोबत घटस्फोटाच्या अफवांवर असिनने साेडले मौन, ‘गजनी’ अभिनेत्रीने पोस्ट करून सांगितले सत्य
‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मधील ‘तुम क्या मिले’ गाणे रिलीज, आलिया-रणवीरच्या केमिस्ट्रीने वेधले चाहत्यांचे लक्ष

हे देखील वाचा