Sunday, May 19, 2024

‘सत्यप्रेम की कथा’चे ‘पसूरी’ गाणे रिलीज, कार्तिक अन् कियाराच्या केमिस्ट्रीने वेधले चाहत्यांचे लक्ष

समीर विद्वांस दिग्दर्शित ‘सत्यप्रेम की कथा‘ हा चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटातून कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यनची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहे. त्याचबरोबर आता या चित्रपटात ‘पसुरी’ हे हिट गाणे रिलीज करण्यात आले आहे. अरिजित सिंग आणि तुलसी कुमार यांनी पसुरीला आवाज दिला आहे. अशात ‘सत्यप्रेम की कथा’चे मुख्य कलाकार कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी या गाण्यात रोमान्स करताना दिसत आहेत.

‘पसूरी’ हे गाणे कार्तिक आर्यन आणि अरिजित सिंग यांचे टीम-अप दाखवते. ‘सत्यप्रेम की कथा’ मधील या गाण्याला अरिजित सिंग आणि तुलसी कुमार यांनी आवाज दिला आहे. यापूर्वी रिलीज झालेली ‘नसीब से’, ‘आज के बाद’, ‘गुज्जू पटाखा’ आणि ‘सुन सजनी’ ही गाणी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. अशात ‘पसुरी’बद्दल सांगायचे तर, ते कोक स्टुडिओने गेल्या वर्षी सादर केले होते. हे गाणे पाकिस्तानी गायक अली सेठी आणि शी गिल यांनी गायले आहे. मूळ गाण्याचे बोल पंजाबी आणि उर्दूमध्ये आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

‘सत्यप्रेम की कथा’ देखील एनजीई आणि नमाह पिक्चर्स यांच्यातील उत्तम सहकार्य दर्शवते. कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांच्याशिवाय सुप्रिया पाठक कपूर, अनुराधा पटेल, राजपाल यादव, निर्मित सावंत, गजराज राव, सिद्धार्थ रंधेरिया आणि शिखा तलसानिया हे कलाकारही या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्याच वेळी, हा चित्रपट 29 जून 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे, जे पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्साही आहेत.( movie satyaprem ki katha song pasoori released aijit singh voice and kartik aaryan kiara advani chemistry wins heart)

अधिक वाचा-
अर्जून कपूरचा वाढदिवस, कथित बॉयफ्रेंडच्या बर्थडे पार्टीत 49 वर्षीय मलायकाचे जोरदार ठुमके, व्हिडिओ व्हायरल

रामानंद सागर यांच्या पणतीवर लैगिंक अत्याचार? अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा

हे देखील वाचा