एंटरटेनमेंट क्वीन राखी सावंत तिच्या स्पष्टवक्ते विधानांसाठी आणि सेंस ऑफ ह्यूमरसाठी ओळखली जाते. ती बर्याचदा पॅपराझींशी बोलताना दिसते आणि तिच्या हटके स्टाईलने सर्वांना हसवते. राखीला लोकांचे लक्ष कशाप्रकारे वेधून घ्यायचे आहे, हे खुप चांगल्याने माहित आहे. अशात नुकतीच राखी सावंत विमानतळावर दिसली, जिथे तिने पायात चप्पल घातलेली नव्हती. काय आहे नेमके प्रकरण? चला जाणून घेऊया…
व्हायरल व्हिडिओमध्ये राखी सावंत (rakhi sawant) ब्लेझरने डोके झाकताना दिसत आहे. राखीने तिचे डोके गुलाबी रंगाच्या ब्लेझरने झाकले आहे आणि ती अनवाणी पायाने चालताना दिसत आहे. राखी म्हणते, “मी नवस केला आहे की, जाेपर्यंत सलमान भाई लग्न करत नाही ताेपर्यंत मी चप्पल घालणार नाही. सलमान भाईने लग्न करावं म्हणून मी श्रीलंका, दुबई येथून चप्पलशिवाय आली आहे.”
अशात राखीच्या या व्हायरल व्हिडिओवर युजर्स जाेरदार कमेंट करत आहेत. एका युजरने अभिनेत्रीची खिल्ली उडवत कमेंटमध्ये लिहिले ही, ‘मग ती मरेपर्यंत चप्पल घालणार नाही’, तर एकाने लिहिले, ‘राखी पागल झाली आहे. काहीही करत राहते.’ त्याचबरोबर अनेक युजर्स हसणारे इमोजी पोस्ट करत आहेत.
View this post on Instagram
अलीकडेच राखीने आदिलपासून घटस्फोट घेत असल्याने ब्रेकअप पार्टीचे आयोजन केले होते. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये राखी लाल रंगाचा लेहेंगा घालून नाचताना दिसत हाेती. ब्रेकअप पार्टीमध्ये राखी म्हणताना दिसली की, “अखेर मी घटस्फोट घेत आहे आणि ही माझी ब्रेकअप पार्टी आहे. लोक दु:खी हाेतात पण मी आनंदी आहे.”
View this post on Instagram
राखी सावंतचे लग्न आदिल खानसोबत झाले होते. मात्र, लग्नानंतर राखीने आदिलवर अनेक गंभीर आरोप केले, ज्यानंतर त्याला 7 फेब्रुवारीला अटक करण्यात आली. राखीने आदिलवर विवाहबाह्य संबंधाचा आरोपही केला होता.(bollywood actress rakhi sawant hilarious mannat for salman khan ki shaadi)
अधिक वाचा-
काजाेलची लेक न्यासा पॅपराझींना हाताळते ‘अशा’ प्रकारे; अभिनेत्री म्हणाली, ‘तिच्या जागी मी असते, तर…’
किशाेरवयात तेजस्वीचा झाला हाेता विनयभंग; खुलासा करत म्हणाली,’मी रस्त्यावर एकटी हाेती अन् दोन मुलं…’










