Tuesday, June 23, 2026
Home भोजपूरी आहा! आकांक्षा दुबेचे ‘मेरे मरद महोदय जी’ गाण्यावर घायाळ करणारे हावभाव, पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

आहा! आकांक्षा दुबेचे ‘मेरे मरद महोदय जी’ गाण्यावर घायाळ करणारे हावभाव, पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

भोजपुरी चित्रपटसृष्टीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या त्यांच्या सौंदर्यासोबतच त्यांच्या बिनधास्त अंदाजाने चाहत्यांना दिवाना बनवण्याची एकही संधी सोडत नाही. यामध्ये यामिनी सिंग, राणी चटर्जी, प्राची सिंग, आम्रपाली दुबे, काजल राघवानी, पाखी हेगडे या अभिनेत्रींचा समावेश आहे. या सगळ्या अभिनेत्री त्यांच्या अभिनया सोबतच त्यांच्या मनमोहक अदांनी सगळ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवताना दिसत आहेत. अशातच आता यामध्ये अजून एका मनमोहक अभिनेत्रीचा समावेश होतो, ती म्हणजे आकांक्षा दुबे.

आकांक्षा दुबे ही तिच्या चित्रपटातील अभिनयामुळे आणि भोजपुरी व्हिडिओ गाण्यामुळे जेवढी ओळखली जाते, तेवढीच सोशल मीडियावरवरील पोस्टमुळे देखील ओळखली जाते. आकांक्षा नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांचे मनोरंजन करत असते. सध्या ती सोशल मीडियावर तिच्या एका व्हिडिओमुळे चर्चित आहे.

आकांक्षाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती भोजपुरी चित्रपटसृष्टीतील पावर हाउस या नावाने संबोधला जाणारा अभिनेता पवन सिंग याच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तिने ‘मेरे मरद महोदय जी’ या गाण्यावर घायाळ करणारे हावभाव करत परफॉर्मन्स केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू की, आकांक्षा एका कारमध्ये बसलेली आहे. तिने सुंदर ड्रेस घातला आहे. या व्हिडिओमधील तिच्या डोळ्यांचे इशारे पाहून कोणीही सहज तिच्या प्रेमात पडेल.

नुकतेच काही दिवसांपूर्वी आकांक्षा समर सिंगच्या ‘नमरीया कमरीया मे खोस देब’ या गाण्यात दिसली होती. त्यांचे हे गाणे यूट्यूबवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. खूप कमी कालावधीत या गाण्याला लाखो व्ह्यूज मिळाले होते. या गाण्यातील आकांक्षा दुबे आणि समर सिंग यांच्या जोडीला खूप प्रेम मिळाले होते. याव्यतिरिक्त ती समर सिंगसोबत अनेक गाण्यांमध्ये दिसली होती. या गाण्यासोबतच तिची ‘चल बाबू बोल’ आणि ‘भोरहरी बिगडले बा मनवा’ ही गाणी देखील प्रदर्शित झाली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘रजऊ के पढ़ाईब’ नंतर प्रमोद प्रेमीच्या ‘चईत के टेम्परेचर’ गाण्यानेही गाठला मोठ्या व्ह्यूजचा टप्पा!

-कमालच! भोजपुरी स्टार ऋचा दीक्षित आणि प्रवेश लालने केला ‘काली नागिन के जैसी…’ गाण्यावर रोमान्स

-कोरोनामुळे स्टेज शो न करणाऱ्या खेसारी लाल यादवच्या गाण्याचा नवा विक्रम, दोन दिवसांतच मिळाले २० लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज

-खेसारी लाल यादवच्या ‘पड़ोसन शोषण करती है’ गाण्याचा यूट्यूबवर राडा! पार केला २८ लाख व्ह्यूजचा टप्पा

हे देखील वाचा