Wednesday, October 15, 2025
Home मराठी “नाव ‘बाईपण भारी देवा’ असलं तरी…”, अभिनेते संजय मोने यांची ‘ती’ पोस्ट चर्चेत

“नाव ‘बाईपण भारी देवा’ असलं तरी…”, अभिनेते संजय मोने यांची ‘ती’ पोस्ट चर्चेत

मराठी चित्रपट ‘बाईपण भारी देवा’ हा नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी थेटर बाहेर तूफान गर्दी केली. हा चित्रपट बाॅक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे आहे. या चित्रपटाला महिला वर्गाचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. ‘बाईपण भारी देवा’ने आत्तापर्यंत 12 कोटींहून अधिकचा गल्ला जमवला आहे. त्यावरून प्रसिद्ध अभिनेते संजय मोने यांनी याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

संजय मोने (Sanjay Mone) यांनी पोस्ट करताना लिहिले की, “‘बाईपण भारी देवा’ सध्या हा मराठी चित्रपट उत्कृष्ठ गर्दीत असंख्य चित्रपट गृहात सुरु आहे. माझी बायको सुकन्या कुलकर्णी आणि माझी मुलगी जुलिया त्यात काम करते आहे. म्हणून मी तो पाहायला गेलो. लांब लांब राहणाऱ्या भावंडांना मायेचा ओलावा म्हणजे काय हे चित्रपट दाखवून देतो. सगळ्या बहिणी कुठल्या कारणांमुळे एकत्र येतात ते कारण फार सुंदर पद्धतीने लेखकाने बेतले आहे.”

तसेच, “दिग्दर्शक केदार शिंदे वयाने माझ्यापेक्षा लहान आहे. तरीही तो मला मनाने वागवतो याबद्दल त्याचे आभार. आजही स्त्रियांना त्यांच्या खऱ्या खऱ्या भावना प्रकट करता येत नाहीत आणि कुणीतरी त्या चित्रपटातून दर्शवून दिल्या कि त्यावर प्रेक्षकांच्या समोर येणार हे नक्कीच. सर्वच्या सर्व कलाकार उत्तम काम करतात.” असे म्हणत संजय मोने यांनी कलाकारांचे कौतुक केले.

या दरम्यान, संजय मोने यांनी नाव जरी बाईपण भारी देवा असं असलं तरी पुरुषांनीही हा चित्रपट जरूर बघा असे आव्हान केले आहे. खरं तर ऐन उन्हाळ्यात हा चित्रपट प्रदर्शित करायला हवा होता. पाहिल्यानंतर अनुभवायला मिळणारी शीतल झुळूक एप्रिल-मे-जून सुखावह करून गेला असता, असे मत त्यांनी व्यक्त केले. (Special post by Sanjay Mone about Baipan Bhari Deva movie)

अधिक वाचा- 
साडीचा नखरा…अभिनेत्री आर्या आंबेकरचा पारंपरिक साज
“आपल्या देशातील नेते अशिक्षित, त्यांच्याकडे…”, बॉलिवूड अभिनेत्री काजोलचं मोठ भाष्य

हे देखील वाचा