Monday, September 25, 2023

“आपल्या देशातील नेते अशिक्षित, त्यांच्याकडे…”, बॉलिवूड अभिनेत्री काजोलचं मोठ भाष्य

बॉलिवूडची लाेकप्रिय अभिनेत्री काजोल सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. इतर बॉलीवूड सेलिब्रिटींप्रमाणे ती देखील तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याशी संबंधित प्रत्येक अपडेट चाहत्यांसाेबत शेअर करताना दिसते. अतिशय उत्तम आणि प्रतिभावान अभिनेत्री म्हणून काजोलकडे पाहिले जाते. काजोल म्हणजे नुसता सळसळता उत्साहच होय. ती नेहमीच चित्रपटांसोबतच विविध कार्यक्रमांना दिसते.तसेच काजोल विविध विषयांवर तिचे मत मांडत असते.

काजोलने (Kajol) अभिनयाच्या जोरावर खूप प्रसिद्धी मिळवली आहे. तिने ‘कुछ कुछ होता है’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’,’ इश्क’ या चित्रपटात दमदार कामगिरी केली आहे. तिचे हे चित्रपच चाहते आजही आवडीने पाहतात. गेल्या काही दिवसांपासून काजोल ‘द ट्रायल’ या वेबसीरिजमुळे चांगलीच चर्चेत आहे. या दरम्यान काजोलने सध्याच्या राजकारणावर मोठ भाष्य केले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिच्या या वक्तव्याची जोरदाक चर्चा रंगली आहे.

काजोल म्हणाली की,”आपल्या देशातील बदल हे खूप मंद गतीने होतात. कारण आपल्या भारत परंपरा आणि विचार यात गुरफटला गेला आहे. याचा संबंध साहजिकच शिक्षणाशी जोडला गेला आहे. आपल्याकडे असेच राजकारणी मंडळी आहेत. ज्या नेत्यांना कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नाही. मला माफ करा, पण मी बाहेर जाऊन हे पुन्हा बोलेल. सध्या भारतावर राजकारण्यांची सत्ता आहे. पण आपल्यातील अनेक नेते असे आहेत, ज्यांच्याकडे योग्य दृष्टीकोनही नाही आणि तो फक्त शिक्षणामुळेच येऊ शकतो.”

काजोलने केलेल्या या वक्तव्यानंतर तिला खूप ट्रोल केले जात आहे. सध्याच्या राजकीय परिस्थीती पाहूण काही नेटकरी काजोलच्या या वक्तव्याशी सहन आहेत. काहीनी ती बरोबर बोलत असल्याचे म्हटले आहे. सध्या काजोल तिच्या नवीन वेबसीरिज ‘द ट्रायल’मुळे चर्चेत आहे. तिच्या या नवीन वेब सीरिजसह अभिनेत्रीने ओटीटीच्या जगातही प्रवेश केला आहे. काजोल लवकरच ‘द ट्रायल’मध्ये वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे. (Actress Kajol Devgan’s big commentary on the political situation)

अधिक वाचा-
अमृता खानविलकरच्या ‘त्या’ डान्स व्हिडिओने लावले सर्वांनाच वेड! चाहत्यांसह कलाकारही झाले फिदा
जांभळ्या साडीमध्ये शिल्पाचं घायाळ करणारं सौंदर्य

हे देखील वाचा