Saturday, September 7, 2024
Home मराठी ‘बाईपण भारी देवा’ पाहून थिएटरबाहेर येताच आदेश बांदेकर भावुक; केदार शिंदेंना मारली मिठी

‘बाईपण भारी देवा’ पाहून थिएटरबाहेर येताच आदेश बांदेकर भावुक; केदार शिंदेंना मारली मिठी

‘बाईपण’ समजून घ्यायचं असेल तर बाईच व्हायला हवं का? असा प्रश्न तुम्हालाही कधी पडला असेलच. आपल्या देशात अनेक घरांमध्ये बाईकांना वेगवेगळ्या पद्धतीची वागणूक दिली जाते. एकीकडे स्त्रीची पूजा, तर दुसरीकडे तिचा छळ असा दुटप्पीपणा सध्या दिसू येत आहे. याच ‘बाईपण’ची कथा सांंगणारा चित्रपट ‘बाईपण भारी देवा!’ नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे हे आहेत.

‘बाईपण भारी देवा!’ (Baipan Bhari Deva) हा चित्रपट 30 जूूनला प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपट गृहात गर्दी करत आहेत. नुकताच हा चित्रपट महाराष्ट्राचे लाडके भावोजी म्हणजे अभिनेते आदेश बांदेकर यांनी पाहिला आहे. त्यानंतर सोशल मीडियवर एक पोस्ट व्हायरल होत आहे. जी सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

आदेश बांदेकर (Adesh Bandekar) आणि केदार शिंदे फार जुने मित्र आहेत. बाईपण भारी देवा सिनेमाच्या निमित्तानं या मित्रांच्या मैत्रीचा एक भावुक क्षण सध्या सोशल मीडियावर समोर आल आहे. सोशल मीडियावर पोस्ट करताना केदार शिंदे यांनी एक फोटो शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kedar Shinde (@kedarshindems)

पोस्ट करताना केदार शिंदे यांनी लिहिले की, “गेली कित्येक वर्ष “होम मिनिस्टर” या कार्यक्रमाच्या निमित्ताने, दार उघड बये दार उघड म्हणत, वहिनींना मानाची पैठणी देणारा, त्यांचं मन जाणून घेऊन त्यांना बोलतं करणारा.. आदेश बांदेकर याने काल बाईपण भारी देवा सिनेमा पाहून कडकडून मिठी मारली.. बायकांच्या जवळचा भावोजी जेव्हा अशी प्रतिक्रिया देतो तेव्हाच कळून चुकतं की, आपल्याला बायकांच्या मनातलं नुसतं ऐकू नाही तर समजू लागलंय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.” त्यांची ही पोस्ट पाहून नेटकरी त्या दोघांच्या कौतुक करत आहेत.

अधिक वाचा- 
– ‘गदर 2’च्या प्रॉडक्शन हाऊसबाबत अमीषा पटेलचा मोठा खुलासा, केले ‘हे’ गंभीर आरोप
जैद हदीदसोबतच्या किसिंग सीनवर आकांक्षाने तोडले मौन, ‘मला खूप…’

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा