स्टार प्रवाहवरल ‘मुरांबा‘ ही मालिका घराघरात पोहचली आहे. या मालिकेतील पात्रांनी आपली एक नवी ओळख निर्माण केली आहे. त्यामालिकेत रमा आणि अक्षयची जोडी खूपच प्रसिद्ध झाली. या मालिकेतील अक्षयचे पात्र अभिनेता शशांक केतकर साकारले आहे. त्याच्या या भूमिकेला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. शशांक नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असतो.
शशांकचे (Shashank Ketkar ) लाखो चाहते आहेत. त्याने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. शशांक सोशल मीडियावर सतत सक्रिय असतो. तो त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्याच्या पोस्टवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत असतात. शशांकने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. जी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
शशांकने सामाजिक मुद्यांवर आपले मत मांडत असतो. शशांकने एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा फोटो कुठल्या तरी बस स्थानकावरील आहे. त्या फोटोमध्ये एक चित्र दिसत आहे. त्यानवरून अस समजत आहे की, प्रवाशांना रांगेत उभे राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
फोटो शेअर करताना शशांकने कॅप्शनमध्ये लिहीले की, “आता मला खरं खरं सांगा… bus stop वर रांगेत उभे राहा, हे सांगण्यासाठी penguin वापरायची काय गरज होती.” त्याचवेळी त्याने #smart #witty #politics #maharashtra असे हॅशटॅगही वापरले आहेत. तसेच त्या फोटोमध्ये पेंग्विन एका रांगेत उभे राहीलेले दिसत आहेत. शशांकच्या या पोस्टवर युजरने अनेक कमेंट केल्या आहेत.
View this post on Instagram
शशांकच्या या पोस्टवर अभिनेता समीर खांडेकरने कमेंट केली आहे. त्याने कमेंट करताना लिहिले की, “कारण, आबा ऐकणार नाहीत.” तसेच एका युजरने लिहिले की, “कारण आजकाल लोक अजिबात शिस्त पाळत नाहीत. त्यांना शिकवायची खूप गरज आहे..आता तर माणसांना प्राण्यांकडून शिकण्याची गरज आहे..मग ते मुंगी असो किंवा पेंग्विन…” त्यामुळे शशांकची ही पोस्ट चांगलीत व्हायरल होत आहे. (marathi famous actor shashank ketkar share bus stop photo of penguin see caption details)
अधिक वाचा-
–स्पीड भोवला: मनोरंजनविश्वातील ‘या’ सुपरस्टारला भरावा लागला भुर्दंड
–दृष्ट लागावी इतके सुंदर आहे गिरिजा प्रभूचे सौंदर्य, फोटो व्हायरल