Friday, December 13, 2024
[aioseo_breadcrumbs]

प्रिया बेर्डे पु्न्हा छोट्या पडद्यावर, ‘या’ मालिकेतून करणार पुनरागमन

90च्या दशकातील अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी आपल्या भूमिकेतून प्रेक्षकांच मनोरंजन केलं आहे. आता पुन्हा एकदा मालिकाविश्व गाजवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. अभिनेत्री प्रिया बेर्डे आता छोट्या पडद्यावर पुनरागमन करीत आहेत. कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘सिंधुताई माझी माई’ या नव्याकोऱ्या मालिकेत प्रिया बेर्डे दिसणार आहेत. या मालिकेतून सिंधुताई यांचं बालपण दाखवण्यात येणार आहे.
प्रिया बेर्डे  (priya berde) या सिंधुताईंच्या आजी म्हणजेच पार्वती साठे या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांनी यापूर्वीही बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे. पण, सात वर्षांच्या विश्रांतीनंतर आता त्या पुन्हा एकदा महत्त्वाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. ही मालिका गेल्या काही दिवसांपासूप चर्चेत आली आहे. या मालिकेत किरण माने देखील दिसणार आहेत.
आपल्या भूमिकेबद्दल प्रिया बेर्डे म्हणाल्या की, “माझ्याकडे ही मालिका अचानक आली. मी सात वर्षांपासून मालिकाच केलेल्या नव्हत्या. मी चित्रपट केले, नाटकं केली. भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ठच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून कलाकार आणि तंत्रज्ञान यासाठी खूप काम करतेय. त्यामुळे या सगळ्या व्यापातून मालिका करणं खूप अवघड होतं. पण ‘कलर्स’ने खूप सपोर्ट केला. आमचे निर्माते मंगेश जगताप यांनी माझ्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या. ते म्हणाले, 10-15दिवस नक्की द्याल ना?’ तर मी म्हटलं की, नक्की देईन. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिंधुताई यांच्यावर आधारित मालिका असल्यामुळे मी होकार दिला.”
दरम्यान, प्रिया बेर्डे यांच्याव्यतिरिक्त या मालिकेत अभिनेते किरण मानेसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. सिंधुताईंचे वडील अभिमान साठे यांच्या भूमिकेत किरण माने पाहायला मिळणार आहेत. ‘सिंधुताई माझी माई’ मालिका 15 ऑगस्टपासून सुरू होणार आहे.(actress priya berde comeback on television sindhutai mazi mai marathi serial)

हे देखील वाचा