Monday, October 14, 2024
Home अन्य पाहा सुभेदारांचं कुटुंब! ‘या’ चित्रपटात दिसणार मृणाल कुलकर्णी, लेक विराजस आणि सून शिवानी पहिल्यांदाच एकत्र

पाहा सुभेदारांचं कुटुंब! ‘या’ चित्रपटात दिसणार मृणाल कुलकर्णी, लेक विराजस आणि सून शिवानी पहिल्यांदाच एकत्र

काही कुटुंब व्यवसायात, तर काही कलेत एकत्र रमतात. अभिनय, लेखन, दिग्दर्शन अशा तीनही माध्यमातून कलेचा वारसा समर्थपणे जपत रसिकांचे मनोरंजन करणारे, कलेत रमणारे असेच एक कुटुंब आगामी ‘सुभेदार’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहे. प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, त्यांचा अभिनेता पुत्र अभिनेता विराजस कुलकर्णी आणि त्याची पत्नी अभिनेत्री शिवानी रांगोळे हे तिघंही पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.

सुभेदार’ या आगामी चित्रपटात मृणाल कुलकर्णी जिजाऊ आईसाहेबांच्या, विराजस जीवाच्या भूमिकेत पहायला मिळणार असून यशोदाबाई मालुसरेच्या भूमिकेत शिवानी रांगोळे दिसणार आहे. आपल्या आजोबांकडून मिळालेला इतिहासाचा वारसा जपत मृणाल कुलकर्णी यांनी वेगवेगळ्या ऐतिहसिक भूमिकांमधून आपला ठसा उमटवला आहे.

‘सुभेदार’ याचित्रपटात तान्हाजी मालुसरे यांना कुटुंबाने कशी मोलाची साथ दिली हे पाहायला मिळणार असून या चित्रपटाच्या निमित्ताने आमचं कुटुंबही एकत्र आल्याचा आनंद वेगळा असल्याचं मृणाल कुलकर्णी सांगतात. सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या असीम शौर्याची गाथा उलगडणारा दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘सुभेदार’ चित्रपट 18 ऑगस्टला आपल्या भेटीला येतोय.

 ए.ए.फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंटचीप्रस्तुती असलेल्या ‘सुभेदार’ चित्रपटाची निर्मिती राजवारसा प्रोडक्शन, मुळाक्षर प्रोडक्शन, पृथ्वीराज प्रोडक्शन, राजाऊ प्रोडक्शन, परंपरा प्रोडक्शन यांनी केली आहे. प्रद्योत  पेंढारकर, अनिल वरखडे,  दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर, श्रमिक गोजमगुंडे, विनोद जावळकर, शिवभक्त अनिकेत जावळकर, श्रुती दौंड हे ‘सुभेदार’ चित्रपटाचे निर्माते आहेत. (Mrinal Kulkarni, Lake Virajas and Son Shivani will be seen together for the first time in the movie Subhedar)

अधिक वाचा- 
कामाच्या स्पर्धेपेक्षाही मैत्री महत्वाची! ‘हे’ आहेत मराठीतील घट्ट कलाकार मित्र
मैत्रीदिनी मित्राला भन्नाट डायलॉग मारायचाय?, तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी, वाचा 31 डायलॉग एकाच क्लिकवर

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा