बॉलिवूडला आणखी एक धक्का बसला आहे. दिग्गज अभिनेते आणि चित्रपट निर्माते ललित बहल यांचे कोरोना व्हायरसमुळे निधन झाले आहे. ते ७१ वर्षांचे होते. मागील आठवड्यातच त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांना दिल्ली येथील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. शुक्रवारी (२३ एप्रिल) रुग्णालयातच त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची माहिती त्यांचा मुलगा दिग्दर्शक कनू बहलने दिली. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
ललित बहल यांना हा आजारही होता
कनू बहलने सांगितले की, त्यांना याआधीही हृदयाशी संबंधित समस्या होती. ते मागील आठवड्यात कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर त्यांची तब्येत खूपच बिघडली होती. त्यांच्या फुफ्फुसातील संक्रमण खूप वेगाने पसरले त्यामुळे त्यांना वाचवता येऊ शकले नाही.
Extremely saddened by the demise of one of my dearest and most respected Co-actors, Lalit Behl jee. Who, so brilliantly played the father in @MuktiBhawan! I feel the loss of my father again! Dear Kanu I am so very sorry for your loss! pic.twitter.com/wfbj22yQgd
— Adil hussain (@_AdilHussain) April 23, 2021
कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत अनेक कलाकारांचा जीव घेतला आहे. नुकतेच दिग्गज संगीतकार श्रवण कुमार राठोड आणि अभिनेते अमित मिस्त्री यांनी कोरोनामुळे या जगाचा निरोप घेतला होता.
ललित यांचे चित्रपट
ललित यांनी दिग्दर्शक आणि निर्माते म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘तपिश’, ‘आतिश’, ‘सुनहरी जिल्द’ यांसारख्या चित्रपटांनी केली होती. त्यांनी प्रसिद्ध टीव्ही शो ‘अफसाने’मधून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती.
काही वर्षांपूर्वी त्यांनी ‘जजमेंटल है क्या’, ‘तितली’ आणि ‘मुक्ती भवन’ यांसारख्या चित्रपटांत काम केले. विशेष म्हणजे सन २०१४ साली रिलीझ झालेल्या ‘तितली’ या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांचा मुलगा कनू बहलनेच केले होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-दु:खद! ‘यमला पगला दीवाना’ फेम अभिनेते अमित मिस्त्री यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
-‘पार्टनर नव्हे, तर छोटा भाऊ गमावलाय मी!’ संगीतकर श्रवणच्या मृत्यूवर ढसाढसा रडला नदीम
-कुंभमेळ्यात सहभागी झाले होते संगीतकार श्रवण राठोड, तिथं झाली होती कोरोनाची लागण










