Friday, January 30, 2026
Home बॉलीवूड …म्हणून आदित्य नारायणने त्या चाहत्याला मारलं अन् फोन दिला फेकून

…म्हणून आदित्य नारायणने त्या चाहत्याला मारलं अन् फोन दिला फेकून

गेल्या दोन दिवसांपासून गायक आदित्य नारायण Aditya narayan) चांगलाच चर्चेत आला आहे. भर कॉन्सर्टदरम्यान आदित्यने त्याच्या चाहत्यासोबत गैरवर्तन केल्याने सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली. नेटकऱ्यांसह सेलिब्रेटीदेखील त्याच्यावर संतप्त प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. अशातच त्यानं असं का केलं? या खुलासा झाला आहे.

लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान एका चाहत्याच्या हातावार आदित्यने मारलं, त्याचा फोन हिसकावून घेतला. इतकेच नव्हे तर त्याने चाहत्याचा फोन फेकूनही दिला असल्याची घटना घडली. यानंतर त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. त्यानंतर त्याच्यावर टीकेची झोड उठली. दरम्यान, या घडलेल्या प्रकारामागे नेमकं काय कारण आहे याची माहिती इवेंट मॅनेजरने दिली आहे.

इवेंट मॅनेजरने दिलेल्या माहितीनुसार, आदित्यने ज्या चाहत्यासोबत गैरवर्तन केल तो त्या कॉलेजचा नव्हता. तो शोदरम्यान सतत आदित्यचे पाय ओढत होता. त्यामुळे आदित्यला राग अनावर झाला आणि त्या चाहत्याचा फोन फेकून दिला. या घटनेनंतर हा शो पुढे २ तास सुरु राहिला मात्र, तो चाहता पुन्हा दिसला नाही.

नेमकं काय घडलं होत?
आदित्य नारायण छत्तीसगडमधील एका कॉलेजमध्ये कॉन्सर्टसाठी गेला होता. या कॉन्सर्टला मोठ्या प्रमाणात प्रेक्षक उपस्थित होते. यावेळी आदित्य शाहरुख खानच्या डॉन या चित्रपटामधील गाणं गात होता. दरम्यान आदित्यचा संयम सुटला. एक चाहता त्याच्या फोनमध्ये त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करत होता. त्यावेळी आदित्यचे त्याच्याकडे लक्ष गेलं. त्याने माईकने त्याच्या हातावर मारलं, नंतर फोन हिसकावून गर्दीत फेकून दिला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-
‘आर्टिकल 370’ नंतर यामी गौतम सिनेसृष्टीला ठोकणार राम राम; चर्चेला उधाण

मलायकाला राग अनावर; CM शिंदेंना टॅग करत केली कारवाईची मागणी, काय आहे प्रकरण?

हे देखील वाचा