Monday, June 23, 2025
Home टेलिव्हिजन ‘मला तुला गमवायचे नाही, माझ अजूनही…’, ईशासाठी अजूनही तडफतोय अभिषेक

‘मला तुला गमवायचे नाही, माझ अजूनही…’, ईशासाठी अजूनही तडफतोय अभिषेक

काही दिवसांपूर्वीच बिग बॉस सीझन १७ चा ग्रँड फिनाले पार पडला. बिग बॉसच्या घरात अनेक गोष्टी घडल्या काही घटना समोर आल्या. विशेष म्हणजे, अभिषेक कुमार आणि अभिनेत्री ईशा मालवीय (Isha Malviy) यांचे रिलेशनशिप संपूर्ण सीझनमध्ये चर्चेत रहिले आहे. मात्र, अभिषेकने आपल्या रिलेशनशिपच्या चर्चांचा पुर्णविराम देण्याचा अनेकदा प्रयत्न केला. त्याने आपण या नात्यातून आता पुढे निघून गेल्याचे म्हटले होते. मात्र, त्याच्या मनात अजुनही ईशाच आहे. त्याचे ईशावरील प्रेम काही कमी नाही झालेलं. याचा प्रत्यय त्याने लिहलेल्या एक नोटमधून येतो.

अभिषेकने गुरुवारी रात्री आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक नोट शेअर केली. यामध्ये अभिषेकने कुणाचे नाव किंवा कुणाला टॅग केले नाही. पण त्याच्या स्टोरीचा आशय पाहून त्यांची ही स्टोरी ईशासाठीच असल्याचे बोलले जात आहे.
‘मी अजूनही तुझ्यावर तितकेच प्रेम करतो, मला तुला कधीही गमावायचे नाही, पण तुला आता मी नको आहे. माझं मनं तुझ्यासाठी हेलकावत आहे.’ अशा आशयाची स्टोरी अभिषेकने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. पण त्याने कुणाचे नाव घेतलेलं नाही. त्याची ही पोस्ट पाहून सोशल मीडियावर पुन्हा ईशा आणि अभिषेकच्या नात्याच्या चर्चेला उधाण आलं आहे.

अभिषेक कुमार ‘बिग बॉस सीझन १७’चा पहिला उपविजेता ठरला आहे. यानंतर त्याने एका मुलाखतीत ईशासोबतच्या नात्यावर स्पष्टीकरण दिलं होतं. यावेळी त्याला विचारण्यात आले की, याचा अर्थ तो अजूनही ईशावर प्रेम करतो का? तेव्हा त्याने ‘ हा शो संपला असल्याने मला ईशाबद्दल इतर काहीही बोलायला आवडणार नाही. मी एवढेच म्हणेन की, हे आता घडून गेले आहे आणि ईशाबद्दल कोणताही प्रश्न विचारू नका. मी यापुढे तिच्या संपर्कात राहणार नाही, या शोमध्ये येण्यापूर्वी मी एक वर्ष तिच्या संपर्कात नव्हतो.’ भविष्यात त्याला ईशासारख्या व्यक्तीसोबत राहायला आवडेल. अशी भावनाही त्याने त्यावेळी व्यक्त केली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

अक्षय कुमारच्या आधी अरबाज खानला आली होती ‘खिलाडी’ची ऑफर, अभिनेत्याने केला मोठा खुलासा
रकुल आणि जॅकीच्या लग्नाचा सोहळा सुरू, अभिनेत्री संपूर्ण कुटुंबासह पोहोचली ढोल नाईटला

हे देखील वाचा