Friday, May 9, 2025
Home बॉलीवूड चंकी पांडेला मिळणार परदेशी जावई? अंबानींच्या लग्नातील त्या व्हिडीओवरून चर्चेला उधाण

चंकी पांडेला मिळणार परदेशी जावई? अंबानींच्या लग्नातील त्या व्हिडीओवरून चर्चेला उधाण

12 जुलै रोजी झालेल्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत. या भव्य लग्नाला देशभरातून आणि जगभरातून अनेक पाहुणे उपस्थित होते. इंटरनेट लग्नाच्या पाहुण्यांच्या फोटोंनी भरले आहे. दरम्यान, अभिनेत्री अनन्या पांडेचे (Ananya Pandey) काही फोटो समोर आले आहेत, जे आता सर्वाधिक लक्ष वेधून घेत आहेत

Reddit या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनन्या पांडेचे काही फोटो व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये तिच्यासोबत एक परदेशी पाहुणा दिसत आहे. या फोटोंमध्ये दोघेही एकमेकांच्या खूप जवळ दिसत आहेत. एका फोटो हा परदेशी पाहुणा अनन्या पांडेला जवळ धरून बसलेला दिसला होता, त्यानंतर अनन्याच्या अफेअरची चर्चा सुरू झाली आहे.

अलीकडेच अशी बातमी आली होती की अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांचे यावर्षी मार्चमध्ये ब्रेकअप झाले होते आणि आता अनन्याच्या या नवीन फोटोंमुळे तिला तिचे नवीन प्रेम सापडल्याचे बोलले जात आहे. दोघांनाही एकत्र खास क्षण घालवताना पाहून सोशल मीडियावर विविध प्रकारचे अंदाज बांधले जात आहेत.

या परदेशी पाहुण्याबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे की तो वॉकर ब्लँको हा वंटारा कंपनीत काम करणारा कर्मचारी आहे. विशेष म्हणजे अनन्या पांडे वॉकरलाही इन्स्टाग्रामवर फॉलो करते. मात्र, अनन्या पांडेसोबत दिसणारी व्यक्ती वॉकर आहे की नाही हे स्पष्ट झालेले नाही.

अनन्या पांडेने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात चमकदार पिवळा लेहेंगा परिधान केला होता. या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. तिच्या ड्रेसच्या मागे ‘अनंत ब्रिगेड’ असे लिहिले होते. अनन्याच्या या लूकचे फोटोही व्हायरल झाले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

भूमिकन्येची लगीनघाई, रविवार १४ जुलैला सोनी मराठी वाहिनीवर विशेष भाग रंगणार
अमिताभ बच्चन यांनी अक्षय कुमारला दिला होता मोलाचा सल्ला, अभिनेता आजही पाळतो

हे देखील वाचा