संपूर्ण देशात कोरोनाने रौद्र रूप धारण केले आहे. देशातील स्थिती ही खूपच गंभीर झाली आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच त्यांना सोयी सुविधांचा पुरवठा वेळेवर होत नाहीये. त्यामुळे नागरिकांपासून ते शासनापर्यंत सगळेच चिंतेत आहेत. देश या संकटातून कधी बाहेर पडेल याची सर्वजण वाट पाहत आहेत. अनेकजण त्यांना जमेल तशी मदत करत आहेत. यात सगळ्यात टॉपला नाव येते ते म्हणजे बॉलिवूड अभिनेता सोनू सूद. केवळ आताच नाही तर मागच्या वर्षी आलेल्या कोरोनाच्या पहिल्या लाटेत देखील त्याने गरजूंना खूप मदत केली आहे. अनेकजण त्याच्याकडे मदत मागत असतात. कधी विमानतळावर, तर कधी ट्विटरवरून त्याच्याकडे मदत मागत असतात. त्याने मंगळवारी 22 रुग्णांचे जीव वाचवले आहेत.
याआधी सोनू सूदला रात्री एक फोन आला होता. त्याला सांगितले की, हॉस्पिटलमधील परिस्थिती खूपच खराब आहे आणि रुग्णांचे जीव वाचवण्याची खूप गरज आहे. त्यानंतर सोनू सूदने लगेच 15 ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था केली होती.
जेव्हा सोनू सूदच्या टीमला बंगळुरूमधील एआरके हॉस्पिटलमधून मदतीची मागणी केली गेली, तेव्हा लगेच त्याच्या टीमने ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था केली होती. वृत्तांनुसार, मंगळवारी (4 मे) सोनू सूदच्या चॅरिटी फाऊंडेशला निरीक्षक एमआर सत्यनारायण यांनी फोन केला होता. त्यांनी सांगितले की, “हॉस्पिटलची अवस्था खूप खराब आहे आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेक रुग्णांचा जीव जात आहे.”
यावर सोनू सूदने सांगितलेले की, “आमची टीम भारतातील रुग्णांची मदत करण्यासाठी सदैव तयार आहे. एखाद्याचा जीव वाचवणे आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे.” त्याने पुढे सांगितले की, “आम्हाला जेव्हा या गोष्टीची खात्री झाली तेव्हा आम्ही लगेच ऑक्सिजन व्यवस्था करायला सुरुवात केली. संपूर्ण टीमने कोणताही विचार न करता रात्रभर ऑक्सिजनचा पुरवठा केला. यासाठी थोडा जरी वेळ झाला असता, तर अनेकांनी जीव गमवावे लागले असते.”
सोनू सूद हा अनेकांना शिक्षणासाठी, उपचारासाठी, नोकरीसाठी तसेच अनेक गोष्टींसाठी मदत करत असतो. सोनू सूदने केलेल्या या मदतीमुळे अनेक गावांमध्ये त्याचा पुतळा तयार केला आहे, तर काहीजण त्याची पूजा करत आहेत. त्याच्या या समाज सेवेने त्याने सर्वांचे मन जिंकले आहे. लॉकडाऊन दरम्यान त्याने अनेकांना मदत केली आहे. त्याने विदेशात अडकलेल्या अनेक विद्यार्थ्यांना आपल्या देशात परत आणण्यासाठी मदत केली होती.
त्याच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने नुकताच ‘किसान’ हा चित्रपट साईन केला आहे. तसेच तो ‘पृथ्वीराज’ या चित्रपटात देखील दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-