बॉलिवूड अभिनेता सोनू सूद हा एका उत्तम अभिनेता तर आहेच, पण सोबत एक चांगला व्यक्ती देखील आहे. याचा प्रत्यय गेल्या एक वर्षापासून आला आहे. कोरोनाच्या पहिला लाटेपासून ते आतापर्यंत तो गरजूंना मदत करत आहे. पहिल्या लाटेत त्याने मजूर प्रवाशांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी मदत केली होती. लॉकडाऊन झाल्याने मजुरांची कामं गेली होती. त्यामुळे त्यांना खायला देखील नीट मिळत नव्हते. त्यावेळी सोनूने त्यांना त्यांच्या मायदेशी पोहोचवण्याचे काम केले होते. आता देखील तो अनेकांना मदत करत आहे. सोशल मीडियाद्वारे तो अनेक कोरोना रुग्णांना मदत करत आहे. नुकतेच काही जणांनी सोनू सूदच्या मुंबईतील घराबाहेर गर्दी करून त्याच्याकडे मदत मागितली आहे.
त्यावेळी सोनू सूद देखील घराच्या बाहेर येऊन सगळ्यांशी बोलला आणि तो त्यांना नक्की मदत करेल असे आश्वासन दिले. या घटनेचा व्हिडिओ सेलिब्रेटी फोटोग्राफर व्हायरल भयानीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. सोनू सूदचा हा व्हिडिओ पाहून त्याचे चाहते या व्हिडिओवर जोरदार प्रतिक्रिया देत आहेत. सगळेजण त्याचे कौतुक करत आहेत.
त्याच्या या व्हिडिओवर एका युजरने कमेंट केली आहे की, “सर्वांच्या सहमतीने सोनू सूदला पंतप्रधान बनवले पाहिजे. द रिअल मन.” दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे की, “तो वीर हनुमान सारखा आहे जो प्रत्येकाच्या आयुष्यात एक संजीवनी बनून येतो, देव तुला आशीर्वाद देवो.”
मागच्या मंगळवारी सोनू सूदच्या टीमने जवळपास 22 कोरोना रुग्णांचा जीव वाचवला आहे. अर्ध्या रात्री त्यांना बँगलोरमधील एआरके हॉस्पिटलमधून मदतीसाठी फोन करून सांगितले होते की, ऑक्सिजनची गरज आहे. त्या नंतर सोनू सूदच्या संपूर्ण टीमने लगेच काम करून केवळ काही तासांमध्ये 15 ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था केली होती.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-