अभिनेत्री वाणी कपूर (Vani Kapoor) आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. वाणीने 2013 मध्ये ‘शुद्ध देसी रोमान्स’ या चित्रपटातून बॉलिवूड करिअरला सुरुवात केली होती. याआधी तिने मॉडेलिंगच्या जगात खूप नाव कमावले होते. वाणी केवळ तिच्या अभिनयासाठीच नाही तर नृत्यासाठीही प्रसिद्ध आहे. रणबीर कपूरच्या ‘शमशेरा’ चित्रपटादरम्यान वाणीने स्वतः सांगितले होते की, नृत्य हे तिचे पॅशन आहे.
आज ती इंडस्ट्रीत जिथे आहे, तिथे पोहोचण्यासाठी वाणी कपूरला खूप संघर्ष करावा लागला आहे. रिपोर्ट्सनुसार, एकेकाळी ती हॉटेलमध्ये कामही करायची. टूरिझममध्ये बॅचलर डिग्री पूर्ण केल्यानंतर, वाणी कपूरने जयपूरमधील ओबेरॉय हॉटेल्स आणि रिसॉर्ट्समध्ये इंटर्नशिप केली. यानंतर अभिनेत्रीनेही या हॉटेलमध्ये बराच काळ काम केले.
यानंतर वाणी मॉडेलिंगच्या दुनियेकडे वळली. या निर्णयामुळे तिला वडिलांच्या विरोधाला सामोरे जावे लागले, तरीही वाणीने तिचे स्वप्न पूर्ण केले. मॉडेलिंगच्या माध्यमातून अभिनयाच्या दुनियेत प्रवेश करण्यासाठी वाणी मुंबईत आली. येथे तिने एकामागून एक अनेक ऑडिशन्स दिल्या आणि त्यानंतर तिला पहिला चित्रपट मिळाला. चित्रपट कारकिर्दीबद्दल बोलायचे तर, वाणीने दिवंगत अभिनेते सुशांत सिंग राजपूत आणि परिणीती चोप्रा यांच्यासोबत ‘शुद्ध देसी रोमान्स’ चित्रपटाद्वारे अभिनयाच्या जगात प्रवेश केला.
वाणीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण, तिला सर्वाधिक लोकप्रियता रणवीर सिंगसोबतच्या ‘बेफिक्रे’ चित्रपटातून मिळाली. या चित्रपटात दोघांनी एकदा नव्हे तर २३ वेळा लिप लॉक केले होते. वाणी रणबीर कपूरसोबत ‘शमशेरा’ चित्रपटातही दिसली आहे. वाणी कपूर प्रॉपर्टीच्या बाबतीतही खूप श्रीमंत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीची एकूण संपत्ती 18 ते 20 कोटी रुपये आहे. चित्रपटांव्यतिरिक्त ती मॉडेलिंग आणि जाहिरातींमधूनही कमाई करते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –
सुरज चव्हाणची मराठी सिनेमात एन्ट्री ! या सिनेमात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत…
अक्षयच्या मदतीला धाऊन आला सिद्धार्थ आनंद ! ॲक्शन चित्रपटातून करणार पुनरागमन ?










