Tuesday, April 7, 2026
Home बॉलीवूड कंगना रणौतने खरेदी केली नवी लक्झरी कार, किंमत वाचून तुमचेही डोळे होतील पांढरे

कंगना रणौतने खरेदी केली नवी लक्झरी कार, किंमत वाचून तुमचेही डोळे होतील पांढरे

अभिनेत्री आणि राजकारणी कंगना रणौत (Kangana Ranaut) सध्या तिच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. अलीकडेच तिने आपला पाली हिलचा बंगला 32 कोटी रुपयांना विकला आहे. आता अभिनेत्रीने स्वतःसाठी एक नवीन कार खरेदी केली आहे, ज्याची किंमत 3 कोटी रुपये आहे.

लँड रोव्हर मोदी मोटर्सच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर रविवारी अनेक फोटो शेअर करण्यात आली. या फोटोंमध्ये कंगना राणौत पांढऱ्या सलवार-कमीजमध्ये दिसत आहे. ती तिच्या नवीन लग्झरी कारसोबत पोज देताना दिसत आहे. एका फोटो ती तिच्या पुतण्यासोबत आरतीची थाळी घेऊन पूजा करताना दिसली होती.

पोस्ट शेअर करताना, लँड रोव्हर मोदी मोटर्सने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘बॉलिवुडची राणी, कंगना रणौतला तिच्या अद्भुत नवीन राइड रेंज रोव्हरबद्दल अभिनंदन!! रुपेरी पडद्यावर हुकूमत गाजवण्यापासून ते रस्त्यांवर स्टाईलने विजय मिळवण्यापर्यंत, स्वतःला कसे प्रेझेंट करायचे हे तुम्हाला नेहमीच माहीत असते.’

या महिन्याच्या सुरुवातीला कंगनाने तिचा मुंबईतील बंगला विकला होता जो तिच्या प्रॉडक्शन हाऊस ‘मणिकर्णिका फिल्म्स’चे ऑफिस म्हणून वापरला जात होता. मणिकर्णिका फिल्म्स आणि झी स्टुडिओची सहनिर्मिती असलेला ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट 6 सप्टेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता, मात्र काही दृश्यांमुळे तो थांबवण्यात आला आहे. याबद्दल अभिनेत्रीने शेअर केले होते की, ‘मी जड अंतःकरणाने जाहीर करते की माझा ‘इमर्जन्सी’ हा दिग्दर्शन पुढे ढकलण्यात आला आहे, आम्ही अजूनही सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्राची वाट पाहत आहोत, लवकरच नवीन रिलीजची तारीख जाहीर केली जाईल, तुमचे आभार समज आणि संयम.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

जेव्हा लग्नाआधी पत्नी मृदुलासाठी मुलगा बघायला गेले पंकज त्रिपाठी; वाचा रंजक किस्सा
‘बाहुबली’ फेम अनुष्का शेट्टीच्या चाहत्यांसाठी खुशखबर, ‘भागमती’च्या सिक्वेलची नवी माहिती

हे देखील वाचा