Thursday, April 24, 2025
Home अन्य खूपच वाईट! ‘तारका मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील ‘टप्पू’च्या वडिलांचे निधन, कोरोनाने घेतला जीव

खूपच वाईट! ‘तारका मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील ‘टप्पू’च्या वडिलांचे निधन, कोरोनाने घेतला जीव

कोरोनाने देशात हाहाकार निर्माण केला आहे. यातच बॉलिवूड आणि टीव्ही मालिकेतून बऱ्याच वाईट बातम्या समोर येत आहेत. ‘तारका मेहता का उल्टा चष्मा’ या हिंदी मालिकेमध्ये टप्पूची भूमिका साकारणाऱ्या भव्य गांधीचे वडील विनोद गांधी यांचे निधन झाले आहे. ते मुंबईच्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात उपचार घेत होते. ते गेल्या १० दिवसांपासून कोरोना विषाणूविरुद्ध लढत होते. तसेच व्हेंटिलेटरवर होते. त्यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

भव्य गांधी आपल्या कुटुंबासमवेत मुंबईत राहतो. त्याचे वडील विनोद हे एक व्यावसायिक होते. त्यांच्या पश्चात पत्नी यशोदा गांधी आणि दोन मुले निश्चित गांधी, भव्य गांधी आहेत. मोठा भाऊ निश्चित गांधी याचे लग्न झाले असून भव्य गांधीनेही आपले शिक्षण पूर्ण केला आहे. आता त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीवर लक्ष केंद्रित केले आहे.

भव्य गांधीने चार वर्षांपूर्वी, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका सोडली होती. तो २००८ मध्ये या मालिकेत सहभागी झाला होता. भव्य गांधी जवळजवळ नऊ वर्षे या मालिकेचा एक भाग होता. मालिकेमध्ये तो जेठालाल (दिलीप जोशी) आणि दया भाभी (दिशा वकानी) यांचा मुलगा, टप्पूची भूमिका साकारत होता. भव्यने मालिका सोडल्यानंतर, त्याची जागा राज आनंदकट याने घेतली होती.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिका सोडल्यानंतर टप्पूने गुजराती चित्रपटातही काम केले आहे. त्याच्या पहिल्या गुजराती चित्रपटात तो मनोज जोशी, केतकी दवे आणि जॉनी लिव्हर या प्रतिभावान कलाकारांसमवेत दिसला होता. टप्पूने मालिका सोडल्यानंतर, अनेक वर्षांनी त्यामागील कारण समोर आले होते, ते म्हणजे या मालिकेतील भूमिकेला पडद्यावरती कमी वेळ मिळत होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अमिताभ बच्चन यांच्या बालपणीचे पात्र साकारून नाव कमावणारा ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता झाला अचानक गायब, आता करतो तरी काय?

-पत्नी आणि मुलींच्या जवळ राहण्यासाठी रणधीर कपूर होणार नवीन घरात शिफ्ट, आपल्या जुन्या घराबाबत उघड केले ‘हे’ गुपीत

-राधे चित्रपटातील किसींग सीनबाबत दिशा पटानीचा मोठा खुलासा, म्हणाली…

हे देखील वाचा