पत्नी आणि मुलींच्या जवळ राहण्यासाठी रणधीर कपूर होणार नवीन घरात शिफ्ट, आपल्या जुन्या घराबाबत उघड केले ‘हे’ गुपीत


दिग्गज अभिनेते रणधीर कपूर यांना नुकतीच कोरोनाची लागण झाली आहे. रणधीर यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांच्यावर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर यापूर्वी दिलेल्या मुलाखतीत रणधीर कपूर यांनी आपल्या कुटुंबीय, मित्र आणि वैयक्तिक आयुष्याबद्दलच्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी चाहत्यांसह शेअर केल्या आहेत.

रणधीर कपूर यांनी आपल्या मुलाखतीदरम्यान खुलासा केला आहे की, पत्नी आणि मुलींच्या जवळ राहण्यासाठी त्यांनी नवीन घर विकत घेतले आहे. मुलाखतीदरम्यान रणधीर कपूर म्हणाले की, ‘बबीता आणि मी अधून मधून भेटत असतो, आणि आम्ही दोघेही तसे आनंदी आहोत. पण मी बांद्रामध्ये घर विकत घेतले आहे. लवकरच मी माझ्या चेंबूरच्या, घरातून बांद्राच्या घरात राहायला जाणार आहे, जेणेकरून मी माझी पत्नी, आणि मुलींच्या जवळ राहू शकेल.’

रणधीर कपूर यांच्या नवीन घराचे काम अंतिम टप्प्यात आले असून ते लवकरच राहण्यासाठी परिपूर्ण होणार आहे. लॉकडाऊनमुळे या घराचे काम थांबले होते. जर काम थांबले नसते, तर आतापर्यंत घराचे काम पूर्ण झाले असते, आणि रणधीर हे सुध्दा त्यांच्या नवीन घरात शिफ्ट झाले असते.

दरम्यान, आपल्या नवीन घराविषयी विचारलेल्या प्रश्नासंदर्भात रणधीर कपूर म्हणाले की,  ‘हे घर मला राहण्यासाठी खूप मोठे आहे.’ चेंबूरमधील जुने घर विकण्याच्या प्रश्नावर रणधीर म्हणाले की, ‘माझ्या आई-वडिलांनी मला सांगितले की, तुम्हाला पाहिजे तोपर्यंत तुम्ही इथे राहू शकता. पण जर घर विकायचे असेल, तर त्या घराचे येणारे पैसे हे घर ऋषी, राजीव, रीमा आणि तुझ्यात वाटून घ्यायचे. मी त्यांना सांगितले की हे होईल, आणि त्यात कोणतीही अडचण नाही.’

रणधीर पुढे म्हणाले की, ‘चेंबूरचे घर विकण्यापूर्वी मी वांद्रे येथे घर विकत घेतले होते. माझे एक चांगला करिअर घडले आहे. मी एक चांगल्या कुटुंबातला आहे, आणि त्यावेळी मी चांगली गुंतवणूक केली होती.’

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-लसीचे दोन्ही डोस घेतलेले असूनही जेष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना कोरोनाची लागण

-‘कौन बनेगा करोडपती’मध्ये भाग घ्यायचाय? पाहा कशाप्रकारे पोहचू शकता यावर्षीच्या हॉटसीटपर्यंत!

-जेव्हा अर्चना पूरन सिंगसोबत बच्चन यांना रंगेहाथ पकडल्याची आली होती बातमी, सगळ्यांनाच बसला होता धक्का


Leave A Reply

Your email address will not be published.