अमिताभ बच्चन यांच्या बालपणीचे पात्र साकारून नाव कमावणारा ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता झाला अचानक गायब, आता करतो तरी काय?


बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी सिनेसृष्टीत बाल कलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. आज आपण अशाच एका बाल कलाकाराबद्दल जाणून घेऊया, ज्यांना ७० आणि ८० च्या दशकात युवा अमिताभ बच्चन म्हणून ओळखले जात असे.

वास्तविक, त्यांनी बिग बींच्या बालपणीचे पात्र साकारले होते. मयूर राज वर्मा असे या अभिनेत्याचे नाव आहे. त्यांची लोकप्रियता इतकी होती की, ते त्यांच्या काळातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या बाल कलाकारांपैकी एक होते.

मयूर राज वर्मा यांनी ७० आणि ८० च्या दशकात, बर्‍याच चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन यांच्या बालपणीच्या भूमिका केल्या आणि स्वतः चे नाव कमावले. बाल कलाकार म्हणून त्यांनी अनेक चित्रपटांत काम केले आहे.

मयूर राज वर्मा यांनी अमिताभ बच्चन यांच्या ‘मुकद्दर का सिकंदर’ या चित्रपटाद्वारे आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली होती. हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक मानला जातो. मयूर राज वर्मा आपल्या पहिल्या चित्रपटामुळे एका रात्रीत स्टार बनले. छोटे अमिताभ बच्चन बनून ते खूप प्रसिद्ध झाले होते.

‘मुकद्दर का सिकंदर’ चित्रपटानंतर बिग बींच्या प्रत्येक चित्रपटासाठी त्यांना साईन केले जाऊ लागले. हळूहळू मयूर राज वर्मा बरेच लोकप्रिय झाले. हे त्या काळात सर्वाधिक मानधन घेणारे बाल कलाकार होते. त्यांनी बिग बींचे बालपण ज्याप्रकारे पडद्यावर सादर केले, हे पाहून प्रेक्षक खूप प्रभावित झाले होते.

त्यानंतर अशी वेळ आली, जेव्हा मयूर राज वर्मा चित्रपटसृष्टीतून अचानक गायब झाले. ते आता भारतापासून दूर वेल्समध्ये राहत आहेत. तिथे ते त्यांच्या पत्नीसह इंडियाना रेस्टॉरंट चालवत आहेत. त्यांची पत्नी नूरी ही एक सुप्रसिद्ध शेफ आहे. या जोडप्याला दोन मुलेही आहेत.

याशिवाय मयूर राज वर्मा हे वेल्सच्या लोकांना बॉलिवूडची ओळख करून देतात. त्यासाठी ते वर्कशॉप व अभिनय वर्गही घेतात. अमेरिकेत त्यांचा कोट्यवधींचा व्यवसाय आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-पत्नी आणि मुलींच्या जवळ राहण्यासाठी रणधीर कपूर होणार नवीन घरात शिफ्ट, आपल्या जुन्या घराबाबत उघड केले ‘हे’ गुपीत

-लसीचे दोन्ही डोस घेतलेले असूनही जेष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना कोरोनाची लागण

-‘कौन बनेगा करोडपती’मध्ये भाग घ्यायचाय? पाहा कशाप्रकारे पोहचू शकता यावर्षीच्या हॉटसीटपर्यंत!


Leave A Reply

Your email address will not be published.