राधे चित्रपटातील किसींग सीनबाबत दिशा पटानीचा मोठा खुलासा, म्हणाली…

Actress Disha Patani Revealed About Kissing Scene Said Salman Khan Did Not Actually Kiss


बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा बहुप्रतिक्षित ‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’ चित्रपट हा येत्या ईदला म्हणजेच १३ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी ‘भाईजान’चे चाहते खूपच उत्साहित आहेत. या चित्रपटातील गाणीही चाहत्यांच्या भेटीला आली आहेत. यामध्ये दिशा पटानी ही मुख्य अभिनेत्री आहे. या चित्रपटातील सलमान आणि दिशा यांच्या वादग्रस्त किसींग सीनमुळे बऱ्याच चर्चांना उधाण आलं होतं. अजूनही यावर चर्चा सुरूच आहेत. या सीनबाबत अभिनेत्याने स्पष्टीकरण दिले आहेच, परंतु आता याबाबत अभिनेत्रीनेही खुलासा केला आहे.

कोईमोईसोबत बोलताना दिशा पटानीने चित्रपटाशी निगडीत अनेक गोष्टी शेअर केल्या. तिने दिग्दर्शक प्रभूदेवासोबतच्या आपल्या चर्चेविषयीही सांगितले. सेटवर मस्ती करण्याव्यतिरिक्त तिने इतरही बऱ्याच गोष्टींबद्दल सांगितले. यासोबतच तिने सलमान खानसोबतच्या किसींग सीनबाबतही स्पष्टीकरण दिले. दिशा आणि सलमान यांच्यातील किसींग सीन पाहिल्यानंतर चाहत्यांना वाटले की, सलमानने ऑनस्क्रीन नो किसींग पॉलिसी तोडली आहे. परंतु यानंतर समजले की, त्याने आपले ओठ चिकटपट्टीने झाकले होते. एका व्हिडिओमध्ये याबाबत बोलताना तिने सांगितले होते की, या चित्रपटात या सीनची आवश्यकता होता.

परंतु यामुळे दिशा ही पहिली अभिनेत्री बनली आहे, जिच्यासोबत सलमान खान नो किसींग पॉलिसी तोडण्याच्या खूपच जवळ पोहोचला होता. याबाबत बोलताना तिने म्हटले की, “शेवटी आम्ही सर्व कलाकार आहोत. तसेच चित्रपटासाठी हा सीन महत्त्वाचा होता. माझ्या बोलण्याचा अर्थ असा की, जेव्हा तुम्ही तो सीन पाहाल, तेव्हा तुम्हाला समजेल. त्यामुळे आम्ही तेच करतो जे आमचे दिग्दर्शक आम्हाला करायला सांगतात. म्हणजेच सलमानने खरोखर किस केले नव्हते. त्यामुळे मला नाही वाटत की, त्याने कोणताही नियम मोडला आहे.”

दिशाने कोरोना व्हायरसदरम्यान चित्रपट प्रदर्शित करण्यावरही चर्चा केली. तिने म्हटले की, “मी खूप आभारी आहे की, या काळात आमचा चित्रपट प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट एका वर्षापासून रखडलाहोता. त्यामुळे मला खूप आनंद होत आहे की, शेवटी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. मला आशा आहे की, हा चित्रपट चाहत्यांपर्यंत पोहोचेल आणि ते त्याचा आनंद घेतील. विशेषत: या कठीण काळात.’

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-पत्नी आणि मुलींच्या जवळ राहण्यासाठी रणधीर कपूर होणार नवीन घरात शिफ्ट, आपल्या जुन्या घराबाबत उघड केले ‘हे’ गुपीत

-लसीचे दोन्ही डोस घेतलेले असूनही जेष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना कोरोनाची लागण

-‘कौन बनेगा करोडपती’मध्ये भाग घ्यायचाय? पाहा कशाप्रकारे पोहचू शकता यावर्षीच्या हॉटसीटपर्यंत!


Leave A Reply

Your email address will not be published.