Sunday, April 12, 2026
Home मराठी ‘द अथर्व सुदामे शो’ला प्रेक्षकांचा जबदरस्त प्रतिसाद, ७ दिवसांत गाठला ‘एवढ्या’ व्हुव्जचा टप्पा

‘द अथर्व सुदामे शो’ला प्रेक्षकांचा जबदरस्त प्रतिसाद, ७ दिवसांत गाठला ‘एवढ्या’ व्हुव्जचा टप्पा

महाराष्ट्राचा लाडका रीलस्टार अथर्व सुदामेच्या (Atharv Sudame) ‘द अथर्व सुदामे शो’ला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. या शोचे दोन एपिसोड सध्या प्रसिद्ध झाले असून या दोनही शोला युट्यूबवर प्रत्येकी लाखांहून अधिक व्हुव्ज आले आहेत. प्रसिद्ध उद्योजक नरेंद्र शांतीकुमार फिरोदिया व अनुष्का मोशन पिक्चर्स व एंटरटेनमेंट यांनी हा शो प्रोड्युस केला आहे, तर या शोचे मुख्य प्रस्तुतकर्ता लेट्सअप आहे.

दोनही एपिसोडला तुफान प्रतिसाद

‘द अथर्व सुदामे शो’च्या पहिल्या एपिसोडमध्ये ‘संगीत मानापमान’ चित्रपटाने हजेरी लावली होती. या शोला आतापर्यंत 1 लाख 22 हजारहून अधिक व्हुव्ज आल्या आहेत. तर दुसऱ्या एपिसोडमध्ये ‘फसक्लास दाभाडे’ सिनेमाच्या स्टारकास्टने हजेरी लावली होती. या एपिसोडला देखील 1 लाखाहून अधिक व्हुव्ज आले आहेत.

रील जगतातील दिग्गज स्टारचा शो

या शोमध्ये जेष्ठ अभिनेते विजय पटवर्धन, अथर्व सुदामे, रुचा जोशी, पवन वाघूळकर, आर्यक पाठक, समीर कोतकर, पुष्कराज चिरपुटकर आणि अक्षय जोशी हे मुख्य कलाकार आहेत तर नचीकेत पेंडसे शोचे दिग्दर्शक आहेत. या शोचे लाईन प्रोडक्शन डिजी रॉईस्टर प्रोडक्शनने केले असून डिजी रॉईस्टरचे शिवतेज होडगे प्रोजेक्ट हेड आहेत.

सई ताम्हणकर- आदित्य सरपोतदार यांनी लावली शोवर हजेरी

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या शोचे एकूण ४ एपिसोड शुट झाले असून तिसऱ्या एपिसोडमध्ये हिंदी सिनेमा ‘संघी’ची टीम व इलू इलू सिनेमाची टीम दिसणार आहे. यात शारिब हश्मी, गौरव मोरे, एली अवराम, आरोह वेलणकर यांनी हजेरी लावली तर चौथ्या एपिसोडमध्ये प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर व आदित्य सरपोतदार यांनी हजेरी लावली.

अनेक सिनेमांच्या टीमकडून प्रोमोशनसाठी शोला पहिली पसंती

शोला मिळत असलेल्या तुफान प्रतिसादामुळे अनेक हिंदी व मराठी सिनेमांच्या चित्रपट प्रोमोशनसाठी ‘द अथर्व सुदामे शो’ला पहिली पंसती देताना दिसत आहेत. येत्या काळात या शोवर वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक दिग्गज दिसण्याची शक्यता आहे.

‘द अथर्व सुदामे शो’चा पहिला एपिसोड

https://youtu.be/Vzvok29NHUc?si=oZxONkMEL5yM-fNc

‘द अथर्व सुदामे शो’चा दुसरा एपिसोड

हे देखील वाचा