Monday, June 23, 2025
Home मराठी ‘इतक्या खालच्या पातळीला जाऊन…’ संतोष जुवेकरच्या समर्थनार्थ उतरली ही अभिनेत्री

‘इतक्या खालच्या पातळीला जाऊन…’ संतोष जुवेकरच्या समर्थनार्थ उतरली ही अभिनेत्री

सध्या विकी कौशलचा छावा हा चित्रपट चांगला चर्चेत आहे. या चित्रपटात अनेक मराठी कलाकारांनी काम केले आहे. त्यातीलच एक अभिनेता म्हणजे संतोष जुवेकर. (Santosh Juvekar) संतोषने या चित्रपटात रायाजीची भूमिका साकारली होती. या चित्रपटानंतर संतोषने अनेक ठिकाणी इंटरव्यू दिले. आणि एका इंटरव्यूमध्ये त्यांनी औरंगजेबाच्या भूमिकेत असलेल्या अक्षय खन्नाची चित्रपटाची शूटिंग होईपर्यंत तो बोलला नाही, असे वक्तव्य केले, आणि त्या वक्तव्यावरून त्याला जोरदार ट्रोल केले गेले. ट्रोलिंग नंतर संतोष जुवेकरने त्यावर प्रतिक्रिया देखील दिली होती. अशातच आता अभिनेत्री रुचिरा जाधव हिने देखील त्याच्या ट्रोलिंग बद्दल मत व्यक्त केले आहे. तिने संतोषचे नाव घेतात तिचे मत instagram वर स्पष्टपणे मांडलेले आहे. तिने instagram वर एक व्हिडिओ शेअर करून तिचे मत मांडले आहे

हा व्हिडिओ शेअर करून रुचिराने असे म्हटले आहे की, “गेल्या बऱ्याच दिवसापासून मी सोशल मीडियावर एक गोष्ट बघत आहे. मला कळत नाही आपला मराठी कलाकार एक छान बॉलीवूडचा चित्रपट करतो त्या छान अभिनय करतो. खरं तर त्याचं हे काम आहे. ही काही वेगळी गोष्ट नाही. त्याचे तो काम करतो आणि मनापासून करतो. तो चित्रपटही आपल्याला आवडतो आणि चित्रपटानंतर प्रोटोकॉल नुसार तो काही मुलाखती देतो. ज्यात त्याला विचारण्यात आलेल्या प्रश्नांची ते छान उत्तर देतो. एक नाही तर कधी कधी अनेक मुलाखती असतात. त्यामुळे सारखाच प्रश्न आणि सारखीच उत्तर असू शकतात. त्यामुळे तो त्याचं काम करतो.”

यापुढे रुचिरा म्हणाली की, “सुरुवातीला त्याच्या कामाचं कौतुक होतं पण काही वेळाने त्या कौतुकाचा रूपांतर ट्रोल्समध्ये होतं. ते ट्रोल्सपर्यंत ठीक आहे. मजा मस्ती म्हणून ते ठीक होतं. पण नंतर त्याची इतकी हद्दपार होते की, एकाने काही पोस्ट टाकल्यानंतर दहा जन तेच टाकतात. सलग सलग त्याच गोष्टी येतात. आणि ते बघून असं वाटतं की तुमच्याकडे इतका वेळ आहे का? जे कोणी हे सगळं करत आहे, त्यांच्याकडे इतका वेळ आहे का की त्या एका व्यक्तीबद्दल वाईट बोलावं? असं काय एवढं केलं आहे त्याने की त्याच्याबद्दल तुम्ही इतक्या खालच्या पातळीवर जाऊन बोलत आहात कशासाठी? जगात दुसरे मुद्दे नाहीत का?

अशाप्रकारे रुचिराने एक व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम वर शेअर केलेला आहे. आणि तिने संतोष जुवेकरचे नाव न घेता त्याला पाठिंबा दिलेला आहे तसेच त्याच्या ट्रॉलर्सला सडेतोड उत्तर दिलेले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

शुक्रवारी नव्हे रविवारी प्रदर्शित होणार सिकंदर; थेट ईदच्या दिवशीच यायचं सलमानचं ठरलं…
चिरंजीवी यांना ब्रिटीश सरकारतर्फे लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड; हा मान मिळवणारे ठरले पहिले भारतीय अभिनेते…

हे देखील वाचा