Sunday, February 8, 2026
Home बॉलीवूड व्हिडिओ: ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितने डान्स परफॉर्मन्स करत वाहिली दिवंगत कोरिओग्राफर सरोज खान यांना श्रद्धांजली

व्हिडिओ: ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितने डान्स परफॉर्मन्स करत वाहिली दिवंगत कोरिओग्राफर सरोज खान यांना श्रद्धांजली

बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितने आपल्या अदांनी आणि आश्चर्यकारक एक्सप्रेशन्सने कोट्यवधी मने जिंकली आहेत. चाहत्यांच्या हृदयात आपले खास स्थान निर्माण करण्याची ती कोणतीही संधी सोडत नाही. सोशल मीडियावर अभिनेत्रीची चांगली फॅन फॉलोविंग आहे. माधुरी तिच्या ग्लॅमरस फोटोंव्यतिरिक्त, तिच्या डान्सबाबतही चर्चेत राहते. त्याचवेळी या दिवसांत माधुरीचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे. कलर्स टीव्हीचा लोकप्रिय शो ‘डान्स दीवाने’ची ही क्लिप, प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा ​​याने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे.

वास्तविक, माधुरी दीक्षित तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, दिवंगत नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांना श्रद्धांजली वाहताना दिसली. तिने शोचे स्पर्धक पल्लवी तोल्ये आणि सीझा रॉय यांच्यासह, २०१२ मध्ये आलेल्या तिच्या ‘कलंक’ या चित्रपटातील ‘तबाह हो गये’ या गाण्यावर डान्स परफॉर्मन्स दिला. अभिनेत्रीने हा डान्स परफॉर्मन्स सरोज खानला समर्पित केला, ज्यांना ती तिची गुरु मानते. प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक सरोज खान यांचे गेल्या वर्षी 3 जुलै रोजी निधन झाले होते.

या व्यतिरिक्त, माधुरी दीक्षितने तिच्या खास दिवशी फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राचे लेटेस्ट कलेक्शन परिधान केले होते. माधुरीची चमकदार शिमरी साडी मेटॅलिक होलोग्रामला प्रभावित करत होती. या मोनोटोन कॉन्ट्रास्ट साडीसह हाफ-कट ब्लाऊज माधुरीच्या लूकला परफेक्ट बनवत होते आणि नेहमीप्रमाणे अभिनेत्री या आउटफिटमध्येही खूपच सुंदर दिसत होती.

माधुरी दीक्षित बॉलिवूडच्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये दिसली आहे. विशेषकरून ८० आणि ९० च्या दशकात ती बॉलिवूडच्या अनेक हिट चित्रपटांमध्ये दिसली आहे. यात ‘तेजाब’, ‘दिल’, ‘साजन’, ‘बेटा’, ‘राम लखन’, ‘परिंदा’, ‘दिल तो पागल है’, ‘हम आपके हैं कौन’ या चित्रपटांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जेव्हा ऐश्वर्याच्या चाहत्याने तिला लग्नासाठी केले होते प्रपोज; ‘अशी’ दिली होती पती अभिषेकने प्रतिक्रिया

-पांढऱ्या वाघाच्या बछड्यासोबत उर्वशीने केले ‘असे’ काही, पाहून तुम्हीही म्हणाल ‘जिगरबाज’

-एक- दोन नव्हे, तर ऋतिक रोशन एका वेळेला खातो चक्क ८ समोसे! स्वतः च केला होता खुलासा

-आलिया भट्टच्या लाईव्ह सेशनमध्ये दिसला रणबीर कपूरअन् तो पण विना शर्ट, एकदा पाहाच हा व्हिडिओ

हे देखील वाचा