Friday, March 27, 2026
Home साऊथ सिनेमा KGF फेम यशची ‘टॉक्सिक’ रिलीज डेट जाहीर; ‘धुरंधर 2’ सोबत बॉक्स ऑफिसवर थेट टक्कर

KGF फेम यशची ‘टॉक्सिक’ रिलीज डेट जाहीर; ‘धुरंधर 2’ सोबत बॉक्स ऑफिसवर थेट टक्कर

कन्नड सुपरस्टार यश यांच्या बहुप्रतीक्षित ‘टॉक्सिक ए फेयरीटेल फॉर ग्रोन-अप्स’ या चित्रपटाच्या काउंटडाउनला सुरुवात झाली आहे. ‘KGF 2’ नंतर तब्बल तीन वर्षांनी यश मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार असल्याने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. काउंटडाउनची नोंद म्हणून यशने एक प्रभावी आणि धमाकेदार पोस्टर शेअर केले असून, ते सोशल मीडियावर क्षणात व्हायरल झाले.

नवीन पोस्टरमध्ये यश एका रक्ताने भरलेल्या बाथटबमध्ये उभा दिसतो. त्यांच्या चेहऱ्यावरचा इंटेन्स लूक आणि संपूर्ण पोस्टरची डार्क थीम चाहत्यांना भुरळ घालत आहे. पोस्टरच्या कॅप्शनमध्ये यशने लिहिले आहे, “पर्यांची कथा 100 दिवसांत उलगडेल.” पोस्टरवरच चित्रपटाची नवी रिलीज डेटही जाहीर करण्यात आली—19 मार्च 2026. आधी हा चित्रपट डिसेंबर 2025 मध्ये रिलीज होणार होता, मात्र निर्मात्यांनी त्यात बदल केला आहे.

‘टॉक्सिक’ची रिलीज ईद 2026 वर असल्याने हा दिवस बॉक्स ऑफिससाठी अधिकच रोमांचक ठरणार आहे. त्याच दिवशी रणवीर सिंहचा ‘धुरंधर पार्ट 2’ देखील प्रदर्शित होत आहे. पहिला भाग प्रचंड यशस्वी ठरल्यानंतर दुसरा भागही मोठ्या स्टारकास्टसह सज्ज आहे—रणवीर सिंह, संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर. माधवन आणि अक्षय खन्ना (Akshay Khanna)प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

‘टॉक्सिक’ हा पीरियड गँगस्टर ड्रामा असून यश यात मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात दक्षिण आणि बॉलिवूडमधील अनेक लोकप्रिय कलाकार झळकणार आहेत—नयनतारा, कियारा आडवाणी, तारा सुतारिया, हुमा कुरैशी, रुक्मिणी वसंत, अक्षय ओबेरॉय आणि सुदेव नायर. हा चित्रपट KVN प्रोडक्शन आणि यशची मॉन्स्टर माइंड क्रिएशन्स यांच्या संयुक्‍त निर्मितीत तयार होत आहे.यश लवकरच रणबीर कपूरच्या ‘रामायण’मध्ये रावणची भूमिका साकारताना दिसणार आहे. त्यामुळे ‘टॉक्सिक’ आणि ‘रामायण’ या दोन प्रोजेक्ट्समुळे यशचे वर्ष 2026 अधिकच भव्य ठरणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

धुरंधर’मधील खलनायक, पण रिअल लाइफमध्ये लक्झरीचा बादशाह, अक्षय खन्नाची संपत्ती पाहून व्हाल थक्क

हे देखील वाचा