Saturday, September 26, 2026
Home › बॉलीवूड › अजय देवगण-अमृता फडणवीसांनी राबवले जुहु बीचवर स्वच्छता अभियान

अजय देवगण-अमृता फडणवीसांनी राबवले जुहु बीचवर स्वच्छता अभियान

अजय देवगण आणि महाराष्टाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि दिव्यज फाउंडेशनच्या संस्थापक अमृता फडवणवीस यांच्यासोबत मुंबईतील जुहु बीचवर स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले. अभिनेत्याने दिव्यज फाउंडेशनच्या सी शोर शाइन 2026 या मोहिमेत भाग घेतला. स्वच्छ समुद्रकिनारे आणि उत्तम कामासाठी नागरिकांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने ही मुंबतील गणपती विसर्जनानंतरची सर्वात मोठे समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम असल्याचे म्हटले जात आहे.

तर या वेळच्या एका व्हिडिओमध्ये अभिनेता अजय देवगण इतर स्वयंसेवकांसोबत गणपती विसर्जनानंतर उरलेला कचरा गोळा करुन पिशव्यांमध्ये भरताना दिसत आहे. या कार्यक्रमात बोलताना अजय म्हणाला जसे आपले घर स्वच्छ ठेवतो तसेच मला वाटते की आपण आपल्या देशावर आपल्या महासागरांवरही प्रेम करतो आणि ही आपली जबाबदारी आहे की, आपण स्वच्छता ठवली पाहीजे.

गणेश विसर्जनानंतर मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर कचरा आणि प्रदुषण वाढत आहे. आणि त्यादरम्यान हा उपक्रम केल्यामुळे हा खुप उपयुक्त ठरला आहे. अभिनेता अक्षय कुमारनेही सणांनंतर मुंबईच्या जुहू बीचवर स्वच्छता मोहिमेत भाग घेतला होता.

अजय (Ajay)देवगणच्या कामाबाबत पाहयचे झाल्यास तो आता ‘दृश्यम: द कन्क्लुजन’ची तयारी करत आहे. आणि त्यामध्ये  जयदीप अहलावत, तब्बू, श्रिया सरन, रजत कपूर, प्रकाश राज, इशिता दत्ता आणि मृणाल जाधव हे कलाकार असणार आहेत. तसेच त्यानंतर अजयचा चौहान आणि गोलमाल 5 हे चित्रपट लाइनअप मध्ये आहेत.

हेही वाचा

भाभी तबाही मध्ये यामी गौतमचा देसी अंदाज, नय्यी नवेलीच्या गाण्याची सर्वत्र चर्चा

हे देखील वाचा