Saturday, September 26, 2026
Home › बॉलीवूड › सिद्धार्थ-तमन्नाच्या ‘द वन’ची दमदार सुरुवात, पहिल्याच दिवशी केली इतक्या कोटींची कमाई

सिद्धार्थ-तमन्नाच्या ‘द वन’ची दमदार सुरुवात, पहिल्याच दिवशी केली इतक्या कोटींची कमाई

सिध्दार्थ मल्होत्रा आणि तमन्ना भाटिया अभिनीत द वन: फोर्स ऑफ द फॉरेस्ट हा चित्रपट नुकताच म्हणजेच 25 सप्टेंबर रोजी रिलीज झाला आहे. तर हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर त्याला प्रेक्षकांकडुन संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. पंचायत आणि परमनंट रुममेट्स यासारख्या मालिकांसाठी ओळखले जाणारे दिपक कुमार मिश्रा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. द वन या चित्रपटाव्दारे त्यांनी बाॅलिवुड क्षेत्रात पाउल ठेवले आहे.

‘द वन: फोर्स ऑफ द फॉरेस्ट’ या चित्रपटाला संमिश्र प्रतिक्रिया जरी आल्या असल्या तरी या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी उत्तम कमाई केली आहे. हि पहिल्या दिवशीची कमाई अपेक्षेपेक्षा अधिक उत्तम झाली आहे. ‘द वन‘ने(the vvan) भारतात पहिल्याच दिवशी 6,746 शोजमधून 8 कोटी रुपये कमावले आहेत. भारतातील त्याची एकूण कमाई अंदाजे 9.60 कोटी रुपये होती. मात्र यापुढील कमाई आणि वीकएंडला चित्रपटाला किती प्रतिसाद मिळते हे पाहण्यासारखे असेल.

हा चित्रपट एक काल्पनिक आणि लोककथा संदर्भावर आधारीत आहे. चित्रपटात, सिद्धार्थ मल्होत्रा ​​​षीची भूमिका साकारतो, जो शहरात वाढलेला एक समजूतदार माणूस आहे आणि आपल्या पत्नी ममतासोबत बिहारमधील आपल्या वडिलोपार्जित गावी परत येतो. या चित्रपटात तमन्ना भाटिया ममताची भूमिका साकारत आहे.

ज्यांना काल्पनिक आणि लोककथा, रहस्यमय कथा आवडतात. त्यांच्यासाठी हा चित्रपट एक उत्तम मेजवाणी आहे. त्यामुळे तुम्ही हा चित्रपट चित्रपटगृहात जाउन पाहु शकता.

हेही वाचा
परिणीती चोप्राने सांगितल्या १५ वर्षांच्या कारकिर्दीतील वेदना, स्वतःच्या चुकांचाही केला खुलासा

हे देखील वाचा