[rank_math_breadcrumb]

नेटफ्लिक्स 2026: ‘इक्का’पासून ‘मिसमॅच्ड 4’पर्यंत मनोरंजनाची मेजवानी, प्रेक्षकांसाठी खास लाईनअप

दरवर्षीप्रमाणे यंदाही नेटफ्लिक्स इंडियाने आपल्या आगामी फिल्म्स आणि वेब सीरिजची घोषणा करण्यासाठी मुंबईत भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले. हा खास इव्हेंट 3 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडला. यामध्ये माधुरी दीक्षित, सैफ अली खान, तृप्ती डिमरी, रोहित सराफ, रवी किशन, एकता कपूर, नीना गुप्ता, मनोज बाजपेयी, अनिल कपूर यांच्यासह अनेक मोठे कलाकार उपस्थित होते.

या इव्हेंटमध्ये एकूण 29 टायटल्स जाहीर करण्यात आले असून, त्यामध्ये 18 वेब सीरिज आणि 11 चित्रपट समाविष्ट आहेत. नेटफ्लिक्सची 2026 ची लाईनअप मनोरंजक, दमदार आणि प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे.

नेटफ्लिक्स 2026 मधील प्रमुख प्रोजेक्ट्स

ऑपरेशन सफेद सागर- कारगिल युद्धातील एका अनकथित मोहिमेवर आधारित ही सीरिज आहे. जिमी शेरगिल, सिद्धार्थ, मिहीर आहूजा, दिया मिर्झा, आदिल हुसेन, प्राजक्ता कोळी यांसारखे कलाकार यात दिसणार आहेत.

इक्का – ‘धुरंधर’नंतर अक्षय खन्ना (Akshay Khanna)‘इक्का’मध्ये प्रमुख भूमिकेत झळकणार असून, त्यांच्यासोबत सनी देओलही दिसणार आहेत.

तलाश: ए मदर्स सर्च – परिणीती चोप्रा, सोनी राजदान, अनुप सोनी, जेनिफर विंगेट यांच्या प्रमुख भूमिका असलेली ही थरारक सीरिज आहे.

मां बहन – माधुरी दीक्षित, रवी किशन आणि तृप्ती डिमरी पहिल्यांदाच एकत्र या चित्रपटात दिसणार आहेत.

मामला लीगल है – सीजन 2 – लोकप्रिय लीगल ड्रामाचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, यावेळी वी.डी. त्यागी जजच्या भूमिकेत दिसणार आहेत.

लस्ट स्टोरीज – सीजन 3 – विक्रमादित्य मोटवाने, किरण राव, शकुन बत्रा, विशाल भारद्वाज यांसारख्या दिग्गज दिग्दर्शकांचा सहभाग असलेला हा बहुचर्चित सीझन आहे.

मिसमैच्ड – फाइनल सीझन – रोहित सराफ आणि प्राजक्ता कोळी स्टारर ‘मिसमॅच्ड’चा शेवटचा सीझन जाहीर झाला आहे.

फॅमिली बिझनेस – अनिल कपूर आणि विजय वर्मा यांची मुख्य भूमिका असलेली ही सीरिज हंसल मेहता दिग्दर्शित आहे.

द ग्रेट इंडियन कपिल शो – सीजन 5 – कपिल शर्माचा लोकप्रिय कॉमेडी शो नव्या सीझनसह परतणार आहे.

घूसखोर पंडित- मनोज बाजपेयी आणि नीरज पांडे यांची दमदार जोडी पुन्हा एकदा या राजकीय-थ्रिलर सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे.

हम हिंदुस्तानी – सैफ अली खान आणि प्रतीक गांधी यांचा पीरियड ड्रामा भारतातील पहिल्या लोकशाही निवडणुकीवर आधारित आहे.

गांधारी – तापसी पन्नू प्रमुख भूमिकेत असलेला हा चित्रपट एका आईच्या राग आणि संघर्षाची कथा सांगतो.

लेगेसी- आर. माधवन आणि अभिषेक बॅनर्जी यांची प्रमुख भूमिका असलेली ही क्राइम-ड्रामा सीरिज आहे.

मुसाफिर कॅफे- विक्रांत मॅसी, महिमा माकवाना आणि वेदिका पिंटो यांची रोमँटिक कथा.

हॅलो बच्चो – भारतीय शिक्षण व्यवस्थेवर आधारित ही सीरिज 6 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.

ढिंढोरा 2 – लोकप्रिय यूट्यूब सीरिज ‘ढिंढोरा’चा दुसरा सीझन लवकरच नेटफ्लिक्सवर येणार आहे.

सुपर सुब्बू – नेटफ्लिक्सची पहिली तेलुगू ओरिजिनल सीरिज, ज्यात मिथिला पालकर महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

एकूणच, नेटफ्लिक्स इंडिया 2026 ही लाईनअप विविध विषय, भाषा आणि शैलींनी भरलेली असून प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मोठी मेजवानी ठरणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

हम हिंदुस्तानी: सैफ अली खान आणि प्रतीक गांधी पहिल्यांदाच एकत्र, उलगडणार भारताची अनकथित कहाणी