प्राजक्ता माळी ही मराठी मनोरंजन क्षेत्रातील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोविंग असणारी अभिनेत्री, फोटोशूट्सने तिच्या चाहत्यांना आकर्षित करत असते. अभिनेत्री सोशल मीडियावर खूपच सक्रिय असून, ती तिच्या उत्कृष्ट फॅशन स्टेटमेंटद्वारे चाहत्यांना प्रभावित करण्याची एकही संधी सोडत नाही. सोशल मीडियावर ती दरदिवशी तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. अशीच तिची एक पोस्ट आता चर्चेचा विषय बनली आहे.
नुकतेच तिने काही फोटो पोस्ट केले आहेत, जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोंमध्ये अभिनेत्रीने नऊवारी सोडली नेसली आहे. विशेष म्हणजे अभिनेत्री यात पाटावर बसून जेवण करताना दिसत आहे. या पोस्टची खास गोष्ट म्हणजे याचे कॅप्शन.
हा फोटो शेअर करत प्राजक्ताने लिहिले की, “खाली बसून, मन लावून, ताजं अन्न, ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ हे आठवून खा. जशी आपली आजी- आजोबांची पिढी खाण्याबाबतीत नियम पाळायची, जे खायची, ते खा आणि निरोगी राहा.” असे म्हणत अभिनेत्रीने चाहत्यांना अन्नाबद्दल अतिशय महत्त्वाचे आवाहन केले आहे. आता तिची ही पोस्ट सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
प्राजक्ताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कॉमेडी शो होस्ट करत आहे. तसेच तिने काही महिन्यांपूर्वी ‘लकडाऊन’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. यात तिच्यासोबत अभिनेता अंकुश चौधरी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. संतोष रामदास मांजरेकर दिग्दर्शित या चित्रपटाचे शूटिंग जुन्नरमध्ये पार पडले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-