[rank_math_breadcrumb]

वेदनेत आहे दीपिका कक्कर, पती शोएबने शस्त्रक्रियेनंतर सांगितली तिची स्थिती 

दीपिका कक्कर हि एक प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री  आहे. पण बऱ्याच दिवसापासून ती आजाराशी झुंजत होती तिला कर्करोग झाला होता आणि आता उपचारादरम्यान तिला अचानक अस्वस्थता जाणवली, त्यामुळे तपासादरम्यान तिच्या शरीरात एक नवीन सिस्ट तयार झाल्याचे आढळले.  त्यामुळे डॉक्टरांनी लगेच दुसरे ऑपरेशन केले आणि ती यशस्वी झाले आहे. पण या दरम्यान तिला प्रचंड वेदना सहन करावा लागल्या अजूनही होत आहे असे तिच्या पतीने सांगितले.अभिनेत्रीचे पती, अभिनेता शोएब इब्राहिम यांनी सोशल मीडियाद्वारे दीपिकाच्या पोटातील सिस्ट काढण्याची प्रक्रिया यशस्वी झाल्याची पुष्टी केली आहे.

तिझ्या पतीने सोशल मीडियावर सर्वांचे आभार मानले आणि सांगितले की तिला अजूनही वेदना होत नसले तरी प्रकृती स्थिर आहे, आणि काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी, शोएब आणि दीपिकाने त्यांचा आठवा लग्नाचा वाढदिवस साजरा केला. त्याच्या नवीनतम YouTube व्लॉगमध्ये, शोएबने पवित्र रमजान महिन्यात त्यांनी साधेपणाने कसे उपवास सोडला आणि स्वयंपाकघरात एकत्र वेळ घालवला हे सांगितले. यावेळी, शोएबने दीपिकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, त्यानंतर दोघे दुसऱ्या दिवशी शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात रवाना झाले होते.

दीपिका गेल्या काही काळापासून स्टेज 2 लिव्हर कॅन्सरशी झुंज देत होती. गेल्या वर्षीपासून तिचा उपचार सुरू आहे, जेव्हा जून 2025 मध्ये तिच्यावर ट्यूमर काढण्यासाठी पहिली मोठी शस्त्रक्रिया झाली होती. तेव्हापासून, दीपिका केमोथेरपी घेउन  बरे होत असल्याचे म्हणले होते. या कठीण प्रवासात, ती तिच्या व्लॉगद्वारे चाहत्यांशी जोडुन राहिली आहे, तिच्या आरोग्यातील चढ-उतार मोठ्या प्रामाणिकपणाने आणि सकारात्मकतेने शेअर केले.

दीपिका (Deepika)आणि शोएबसाठी, त्यांचे चाहते कुटुंबासारखे आहेत, म्हणूनच ते त्यांच्या आरोग्य प्रवासाचे तपशीलवार दस्तऐवजीकरण करतात. दीपिका तिच्या यूट्यूब चॅनेलवर तिचे केमोथेरपीचे अनुभव, तिची मानसिक स्थिती आणि बरे होण्याच्या दिशेने तिची पावले शेअर करते. शोएब त्याच्या व्लॉगद्वारे नियमित अपडेट्स देखील देतो, जेणेकरून त्याचे लाखो चाहते दीपिकाच्या आरोग्याबद्दल खात्री बाळगू शकतील. सध्या, चाहते दीपिकाच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा 

ओ’रोमियो नंतर आता ब्लडी रोमियो, शाहिद प्रमाणे आणखी एक सुपरस्टार करणार गँगस्टरची भुमिका