गीता बसरा ही एक प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री आहे. तर आज त्याचा वाढदिवस आहे. ही अभिनेत्री 13 मार्च 1984 रोजी इंग्लंडमधील पोर्ट्समाउथ येथे जन्मलेली होती. ती इंग्लंडमध्ये वाढली असली तरी अभिनय करण्यासाठी भारतात परतली होती. नाट्यशास्त्रचे तिने लंडनमध्ये प्रशिक्षण घेतले, या प्रशिक्षणाचा कालावधी पाच वर्षे हा होता. नंतर ती मुंबईत आली आणि इथेही तिने अभिनव शाळेत सराव केला. आणि याच दरम्यान तिला पहिला चित्रपट मिळाला होता. मात्र तिचे नंतर लग्न झाले. तर तिचे पती हे क्रिकेटपटू हरभजन सिंगशी आहेत. आणि मग लग्नानंतर तिने चित्रपटापासून दूर राहिली.
क्रिकेटपटू हरभजन सिंगशी लग्न केल्यानंतर अभिनेत्री गीता बसरा (Geeta Basra)चित्रपटसृष्टीतून का दूर गेली? एका मुलाखतीत बोलताना ती म्हणाली, माझी आई एक काम करणारी आई होती. तिने संपूर्ण कुटुंबाचे व्यवस्थापन चांगले केले. आज माझ्याकडे जे काही आहे ते तिच्यामुळे आहे. माझी मुलगी हिनायासोबत घालवलेला प्रत्येक क्षण मी एन्जॉय करते. काम न करणे हा माझा वैयक्तिक निर्णय आहे.
अभिनेत्रीच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 2006 मध्ये “दिल दिया है” या चित्रपटाने झाली, परंतु तिला हिंदी चित्रपटसृष्टीत अपेक्षित यश मिळाले नाही. 2006 ते 2016 दरम्यान, ती फक्त सात चित्रपटांमध्ये दिसली, त्यापैकी एक पंजाबी चित्रपट होता. तिचा शेवटचा बॉलिवूड चित्रपट 2015 मध्ये “सेकंड हँड हसबंड” होता, जो फ्लॉप ठरला. तिचा शेवटचा पंजाबी चित्रपट 2016 मध्ये “लॉक” होता.
अभिनेत्रीचे लग्न 29 ऑक्टोबर 2015 रोजी लग्न केले. 2016 मध्ये, गीताने लंडनमध्ये एका मुलीला, हिनायाला जन्म दिला आणि 2021 मध्ये मुलगा जोवन वीर सिंगला जन्म दिला. अभिनेत्री तिच्या लहान,मोठ्या आयुष्याबद्दलचे अपडेट्स सोशल मीडियाद्वारे वारंवार शेअर करते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
धुरंदर 2 पूर्वी मोठं सरप्राईज, रणवीर सिंग अभिनित धुरंदर होतोय रि-रिलीज










