द 50 हा रियालिटी शो या वर्षीपासून सुरू झाला, आणि हा शो कालांतराने प्रसिद्धही झाला. तर हा लोकप्रिय रियालिटी शो 1 फेब्रुवारी रोजी सुरू झाला होता. या स्पर्धेत एकुण 50 स्पर्धक होते. तसेच यामध्ये सोशल मीडिया टीव्ही सेलिब्रिटी असे एकूण 50 स्पर्धक या खेळात भाग घेतले होते. तर याचा नुकताच ग्रॅण्ड फिनाले पार पडला. द फिफ्टी महाअंतिम सोहळा हा काल पार पडला तसेच विजेत्याचे नाव ही काल घोषित करण्यात आले होते. अंतिम फेरीत फक्त पाच स्पर्धक होते. आणि ‘द फिफ्टी’च्या महाअंतिम फेरीत शिव ठाकरे यांना शोचे विजेते घोषित करण्यात आले. तर शिव ठाकरे 50 लाख रुपयांची बक्षीस रक्कम जिंकली, जी त्यांनी नंतर एका चाहत्याला दिली.
मिस्टर फैसू, काकाजी, रजत दलाल आणि कृष्णा श्रॉफ यांच्याशी शिव ठाकरेने ट्रॉफी जिंकण्यासाठी स्पर्धा केली.’द फिफ्टी’च्या महाअंतिम फेरीत शिव ठाकरे यांना शोचे विजेते घोषित करण्यात आले. ‘द फिफ्टी’च्या आधी, शिव ठाकरे यांनी ‘बिग बॉस मराठी 2’ जिंकला होता. तसेच ते ‘बिग बॉस 16’ चे प्रथम उपविजेते होते. चाहत्यांनी सोशल मीडियावर शिव यांचे अभिनंदन केले आहेत.
शिव (shiv)ठाकरेने ग्रँड फिनालेमध्ये द 50 ट्रॉफी, 50 लाख रुपयांचा चेक जिंकला आहे. या शोच्या स्वरूपानुसार, विजेत्याच्या नोंदणीकृत फॉलोअर्स पैकी एकाला बक्षिसाची मोठी रक्कम मिळाली. तर सीताराम प्रल्हाद अघाव यांना फॅन म्हणून घोषित करण्यात आले. अमरावती येथे जन्मलेल्या शिवने वर्तमानपत्रे, दूध विकण्यापासून सुरुवात केली, आणि पुढे ‘एमटीव्ही रोडीज रायझिंग’ आणि ‘खतरों के खिलाडी 13’ सारख्या शोमुळे तो घराघरात ओळखला जाऊ लागला.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा


