[rank_math_breadcrumb]

रीमा लागूंची हुबेहूब प्रतिमा, मृण्मयी लागूच्या फोटोंमध्ये दिसते रीमा लागूंची हुबेहूब झलक

रीमा लागू ही एक चित्रपटसृष्टी मधील एक लोकप्रिय अभिनेत्री होत्या. या अभिनेत्रीने मराठी आणि हिंदी चित्रपट मध्ये काम केले आहे. हिंदी चित्रपटांमध्ये ‘साजन’, ‘मैने प्यार किया’, ‘हम साथ साथ हैं’ यासारखे चित्रपटांमध्ये तिने अभिनय करून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. तर रीमा लागू यांचे 2017 मध्ये निधन झाले आहे. त्यावेळेस त्या 58 वर्षाच्या होत्या. तर त्यांच्या जाण्याने संपुर्ण चित्रपटसृष्टीतील त्यांचे चाहते हळहळ व्यक्त करत होते. तर आता रीमा लागू आपल्यात नसल्या तरी, त्या त्यांच्या कलेतून आणि चित्रपटांमध्ये साकारलेल्या आईच्या भूमिकांमधून त्यांच्या चाहत्यांच्या हृदयात जिवंत आहेत. पण तुम्हाला रीमा लागू यांच्या मुलीबद्दल माहिती आहे का? चला तर तिच्याबाबत जाणुन घेवुयात. 

रीमा (Reema)लागू यांची मुलीचे नाव मृण्मयी लागू  आहे. जी तिच्या सेम आई सारखी दिसते आणि ती तिच्या पावलावर पाऊल ठेवत आहे. रीमा लागू यांची मुलगी, मृण्मयी लागू, ही देखील तिच्या आईप्रमाणेच मनोरंजन विश्वातील एक प्रसिद्ध व्यक्ती आहे. मृण्मयीने ‘पीके’, ‘थ्री इडियट्स’ आणि ‘थप्पड’ यांसारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच तिने सहाय्यक दिग्दर्शक, स्क्रिप्ट सुपरवायझर म्हणूनही काम केले आहे. ‘बायो’, ‘मुक्कम पोस्ट लंडन’, ‘सातच्या आत घरात’ आणि ‘दोघत तिसरा आता सागळंं विसरा’ यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.

मृण्मयीला तिच्या आईइतकी लोकप्रियता मिळाली नसली तरी, ती दिसण्यात तिच्या आई म्हणजेच रीमा लागू यांच्याशी खूप मिळतीजुळती आहे. ती सोशल मीडियावर सक्रिय आहे. तर तिच्या आगामी प्रकल्पांची माहिती, फोटो चाहत्यांसोबत वारंवार शेअर करत असते. मृण्मयीला पाहिल्यानंतर, सोशल मीडिया चाहते अनेकदा म्हणतात की, ती त्यांना रीमा लागू यांची आठवण करून देते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

600 कोटी पासून काहीच पावलं दूर धुरंधर: द रिव्हेंजचं कलेक्शन, सहा दिवसातच बॉक्स ऑफिसवर मोडले अनेक रेकॉर्डस