‘कहो ना प्यार हैं’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये अमिषा पटेलने पदार्पण केले. अमिषाने तिच्या पहिल्याच सिनेमातून असे स्टारडम मिळवले, जे अनेक सिनेमे करून देखील काही अभिनेत्रींना मिळवता येत नाही. या सिनेमाने हिंदी सिनेसृष्टीला ऋतिक रोशन आणि अमिषा पटेल हे दोन स्टार मिळाले. अमिषाने तिच्या या चित्रपटातील निरागस अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना वेड लावले.
मात्र, नशिबाने ऋतिक रोशन यशाच्या पायऱ्या चढत गेला आणि अमिषाच्या करियरला दोनच चित्रपटानंतर उतरती कळा लागली. अमिषाने तिच्या करियरमध्ये ‘कहो ना प्यार हैं’, ‘गदर’, ‘हमराज’ असे हिट सिनेमे देऊनही अमिषा तिचे स्टारडम टिकवू शकली नाही. तिने तिच्या करियरमध्ये लहान मोठे असे एकूण ४० सिनेमे केले. मात्र, हे चित्रपट तिचे करियर वाचवू शकले नाही. अमिषा तिच्या चित्रपटांपेक्षा जास्त तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिली. सिनेमे मिळवण्यासाठी अमिषाला बोल्ड फोटोशूटचा देखील आधार घ्यावा लागला.
अमिषा सर्वात जास्त तेव्हा चर्चेत आली, जेव्हा तिने तिच्या आई- वडिलांच्या विरोधात तिच्या पैशाच्या अफरातफरीचा आरोप केला. ती एवढ्यावरच नाही थांबली तिने तिच्या आई- वडिलांना कायदेशीर नोटीस पाठवत १२ कोटी रुपये परत मागवले होते. तिचे तिच्या आई- वडिलांसोबत प्रॉपर्टीवरून वाद चालू होते. अमिषाच्या म्हणण्यानुसार, तिच्या वडिलांनी तिच्या पैशांचा गैरवापर केला होता. तिच्या या आरोपांमुळे मीडियामध्ये चांगलीच चर्चा झाली होती.
या आरोपांव्यतिरिक्त देखील अजून एक मोठा आरोप अमिषाने तिच्या पालकांवर केला होता. माध्यमांतील वृ्त्तांनुसार, अमिषा पटेल आणि प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट्ट हे नात्यात होते. त्याच्या अफेयरच्या चर्चा रोज मीडियामध्ये येत होत्या. अशातच जेव्हा अमिषाच्या आईला या नात्याबद्दल समजले, तेव्हा तिने अमिषाला चप्पलने मारून- मारून घराबाहेर काढले होते. अमिषा अद्याप अविवाहित आहे.
सध्या अमिषा मोठ्या पडद्यापासून लांब आहे. ती २०१८ साली ‘भैयाजी सुपरहिट’ या सिनेमात अखेरची दिसली.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…









