80 ते 90 च्या दशकात अनेक मालिका होऊन गेल्या त्यातीलच एक म्हणजे रामायण आणि महाभारत या सिरीयलला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिले. त्यांच्या उत्तम प्रतिसादामुळे आजही त्यातील कलाकार देवतांप्रमाणे प्रेक्षक पूजतात. या सिरीयल मुळे अनेक प्रेक्षक आपली हातातले काम सोडून मालिका पाहत असत. जरी ही मालिका खूप आधी प्रदर्शित झाली असली तरी आज त्याचे एपिसोड्स फोन द्वारे आपण पाहू शकतो आणि याची क्रीज आजही इतकेच आहे. रामानंद सागर यांची ‘रामायण’ ही मालिका 39 वर्षांपूर्वी प्रसारित झाली, आणि तिची कथा, कलाकार आणि प्रत्येक दृश्य आजही लोकांच्या हृदयात कोरले गेले आहेत.
रामानंद सागर (sagar)यांची ‘रामायण’ या मालिकेत या महाकाव्यात एक असे पात्र होते ज्याचे नाव इतिहासात कोरले गेले आहे. आम्ही अरविंद त्रिवेदी यांनी साकारलेल्या ‘रावणा’बद्दल बोलत आहोत. ते आता आपल्यात नसले तरी, या मालिकेने त्यांना लंकेचा राजा रावण म्हणून अजरामर केले. तर याच्या यातील भुमिकेने आजही प्रेक्षक त्यांना विसरु शकले नाहीत.
‘रामायण’मधील अरविंद त्रिवेदी यांचे भीतीदायक हास्य आणि भयानक रूप आजही भीती निर्माण करते. आणि याच गोष्टीमुळे त्यांना लंकेचा राजा रावणाची भूमिका मिळाली आणि लोकप्रियताही मिळाली. त्यांना हे जग सोडून पाच वर्षे झाली आहेत, पण त्यांचे पात्र प्रेक्षकांच्या हृदयात आणि आठवणींमध्ये आजही जिवंत आहे. ‘रामायण’मध्ये रावणाची भूमिका साकारणारे अरविंद, खऱ्या आयुष्यात पूर्णपणे वेगळे होते. ते धार्मिक, शांत आणि प्रभू रामाचे भक्त होते. या भूमिकेमुळे काहींनी तर त्यांचा तिरस्कारही केला, पण त्यांनी ती भूमिका विलक्षणपणे साकारली. तर अरविंद त्रिवेदी यांनी त्याच्या कारकिर्दित एकुण 300 चित्रपटांमध्ये काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
.‘धुरंधर: द रिव्हेंज’च्या OTT रिलीजची घोषणा, जाणुन घ्या स्ट्रीमिंगची तारीख आणि प्लॅटफॉर्म










