[rank_math_breadcrumb]

प्रहारचा टीझर झाला रिलीज, राजकुमार राव यांच्या दमदार लुकने आणला अंगावर काटा

‘प्रहार: द उज्ज्वल निकम स्टोरी’ या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा टिझर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर अतिशय उत्तम प्रतिक्रिया या टीझरच्या फर्स्ट लूकला मिळात आहेत. सध्या पाहिले तर स्त्री 2, भुलभुलय्या 3 यासारख्या मोठ्या चित्रपटांची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. त्यामध्येच प्रहार द उज्ज्वल निकम स्टोरी या चित्रपटाच्या टिझर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या टिझर मध्ये असे दिसून येते की हा चित्रपट एक कोर्ट रूम ड्रामा आहे.

या चित्रपटाची निर्मिती  ‘मॅडॉक फिल्म्स’ने केली आहे. तर ही स्टोरी देशातील सर्वात प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या जीवनावर तसेच त्यांनी लढलेल्या ऐतिहासिक घटनांवर आधारित आहे या टीचर मध्ये कसाबाचा खटला आणि 26/11 चा तो भयानक प्रसंग याची झलक दाखवण्यात येणार आहे.  तसेच या चित्रपटात राजकुमार यांनी प्रमुख भुमिका निभावली आहे. पण त्याचा यातील लुक आता कौतुक होत आहे. हा एक दमदार असा लुक आहे जेनेकरुन अंगावर काटाच येईल.

या चित्रपटाची कथा उज्ज्वल निकम यांच्या कारकिर्दीतील सर्वात आव्हानात्मक आणि हाय-प्रोफाइल टप्प्यावर आधारित असल्याचे टीझरवरून स्पष्ट होते. ही कथा 26/11 चे मुंबईवरील दहशतवादी हल्ले आणि जिवंत पकडलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाब याच्या खटल्याभोवती फिरते. 26/11 हा दिवस हा संपुर्ण महाराष्टाला हदरुन टाकणारा दिवस होता. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन अविनाश अरुण केले आहे. चित्रपटात राजकुमार (rajkumar)राव, ललित प्रभाकर, वामिका गब्बी, जयदीप अहलावत, सिकंदर खेर आणि तरुण शर्मा यासारखे कलाकार असणार आहेत.

57 व्या वर्षी ऍक्शन अवतारात दिसणार अजय देवगण; चौहान सिनेमाचा टिझर झाला रिलीझ