Thursday, July 16, 2026
Home बॉलीवूड ‘एक दिवस तिचं कन्यादान करण्याचं सौभाग्य लाभावं’, वंशिकासाठी अनुपम खेर यांची हृदयस्पर्शी पोस्ट

‘एक दिवस तिचं कन्यादान करण्याचं सौभाग्य लाभावं’, वंशिकासाठी अनुपम खेर यांची हृदयस्पर्शी पोस्ट

अनुपम खेर हे एक ज्येष्ठ लोकप्रिय अभिनेते आहेत. तसेच ते त्याच्या प्रत्येक नवीन प्रकल्प बाबत किंवा त्याच्या आयुष्यातील काही प्रंसागाबाबत सोशल मिडिया वर ते सांगत असतात. तर त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी त्यांचे दिवंगत मित्र आणि अभिनेते सतीश कौशिक यांची मुलगी वंशिका कौशिक हिच्या वाढदिवसानिमित्त गोड फोटोसह पोस्ट शेअर केली आहे. वंशिकाला आपलीच मुलगी मानत, खेर यांनी तिला आनंदी, निरोगी आणि यशस्वी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि तिला आपला खंबीर पाठिंबा असल्याचेही व्यक्त केले.

अनुपम खेर (kher)यांनी वंशिका यांच्यासोबतचे काही हृदयस्पर्शी फोटो शेअर केले आहेत. तर या पोस्ट सोबत त्यांनी लिहिले आहे. की, त्यांचे नाते रक्ताच्या नात्यापलीकडचे असून ते प्रेम, विश्वास आणि जिव्हाळ्यावर आधारलेले आहे. सतीश हयात असतानाही आपण वंशिकाला आपली मुलगीच मानत आलो आहोत, असे सांगत त्यांनी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे वचन दिले.

अनुपम खेर यांना या पोस्ट सोबत एक इच्छा व्यक्त केली आहे. त्यानी लिहले आहे की, कदाचित भविष्यात जेव्हा वंशिका लग्नाचा निर्णय घेईल, तेव्हा तिचे ‘कन्यादान’ करण्याचे भाग्य आपल्याला मिळावा, हा दिवस जरी खुप लांब असला तरी केवळ या विचारानेच त्यांचे मन आनंदाने भरून येते, असे ते म्हणाले आहेत. सतीश कौशिक वरून (स्वर्गातून) स्मितहास्य करत आपल्या मुलीवर आशीर्वादंचा वर्षाव करत असतील, अशी भावना व्यक्त करत त्यांनी आपली पोस्ट संपवली. वंशिकाने या पोस्टला धन्यवाद असे म्हणले आहे.

अनुपम खेर आणि सतीश कौशिक यांची मैत्री आयुष्यभर टिकणारी होती आणि तिची सुरुवात ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मधील दिवसांपासून झाली होती. 2023 मध्ये सतीश कौशिक यांच्या आकस्मिक निधनानंतरहि अनुपम त्यांच्या कुटुंबाच्या संपर्कात राहिले आहेत.

समर्थ रामदास स्वामींच्या विचारांचा आधुनिक प्रवास..; ‘समर्थ’ चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित

हे देखील वाचा