Thursday, August 6, 2026
Home बॉलीवूड जिया शंकरने दिली प्रेमाची कबुली; सोशल मीडियावर शेअर केले खास फोटो

जिया शंकरने दिली प्रेमाची कबुली; सोशल मीडियावर शेअर केले खास फोटो

जिया शंकर हि एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तसेच ती बिग बाॅस ओटीटी 2 मध्येहि काम करुन प्रसिध्दी मिळवली होत. तर  त्याच्याबाबत तिने एक अपडेट शेअर केली आहे. तिने अखेर तिच्या नात्याला दुजोरा दिला आहे. ती एका व्यावसायिक असणाऱ्या करण धनकसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा होती, आणि जियाने हे नाते आता पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे.

जिया शंकरने 5 ऑगस्ट 2026 रोजी, इंस्टाग्रामवर एका भावुक पोस्टद्वारे करण धनकसोबतच्या तिच्या साखरपुड्याची घोषणा केली. या जोडप्याचा साखरपुडा हिरवीगार निसर्गरम्य आणि सुंदर परिसरात एका खाजगी समारंभात झाला. जियाने सोशल मीडियावर तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतचे रोमँटिक फोटो शेअर केले आणि करण धनकसाठी एक भावनिक नोटही लिहिली आहे.

जिया शंकरने अनेक महिने हे नाते गुपित ठेवले होते आणि आता तिने हे नाते साऱ्या समोर कबुल केले आहे.तर या पोस्ट सोबत लिहले आहे की, तिने लिहिले, “कदाचित हे खरं आहे की प्रेम तेव्हाच मिळतं जेव्हा तुम्ही त्याची कमीत कमी अपेक्षा करता, पण इथे देवाने माझ्या संयमाची खरी परीक्षा घेतली तिने याबाबतची पोस्ट सोशल मिडियावर शेअर करताच चाहत्यांनी तिला पुढिल आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आणि अभिनंदन केले आहे.

तिने सोशल मीडिया पोस्टद्वारे करणबद्दलचा आपला आनंद आणि प्रेम व्यक्त केले. जियाने लिहिले, “तू हजारो मैल दूर असूनही, तुझ्यासोबतचे प्रत्येक संभाषण घरासारखे वाटायचे. हा प्रवास सोपा नव्हता, पण आपण दररोज एकमेकांना निवडले. तू मला ते प्रेम दिले ज्याची मी आयुष्यभर वाट पाहत होते.  मी माझे उर्वरित आयुष्य तुझ्यासोबत घालवण्यासाठी आणि तू माझ्यावर जसे प्रेम केले आहेस तसेच तुझ्यावर प्रेम करण्यासाठी आतुर आहे. आय लव्ह यू करण. अशी पोस्ट तिने केली आहे.

हेही वाचा

बॉलिवूडला रामराम ठोकत प्रदीप रावत साऊथमध्ये झाले सुपरहिट; म्हणाले, या कारणासाठी ठोकला होता रामराम

हे देखील वाचा