राजपाल यादव हा एक लोकप्रिय विनोदी कलाकार आहे. त्याने आतापर्यत अनेक चित्रपटात काम केले आहे आणि त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. मात्र सध्या तो एका गोष्टीमुळे कायदेशीर अडचणी अडकला आहे. आणि आता राजपाल यादव यांच्या आर्थिक आणि कायदेशीर अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. १६.६१ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे कर्ज फेडण्यास असमर्थ ठरल्यामुळे, सेंट्रल बँक ऑफ इंडिया ने उत्तर प्रदेशातील शाहजहानपूर येथील त्यांच्या मालमत्तेवर जप्ती आणि लिलावाची नोटीस बजावली आहे. बॅकेने स्पष्ट सांगितले आहे की, गहाण ठेवलेली मालमत्ता 9 सप्टेंबर 2026 रोजी ऑनलाइन पध्दतीने करण्यात येणार आहे.
अभिनेता राजपाल यादव (yadav)याला ‘आता पता लपता’ या चित्रपटाशी संबंधित चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावल्यानंतर लगेचच ही घडामोड समोर आली आहे. नवीन वृतानुसार सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मुंबई शाखेच्या सूचनेनुसार, शाहजहानपूर शाखेचे व्यवस्थापक अनुज वर्मा यांनी बांदा येथील राजपालच्या यादव भवनला लिलावाची नोटीस लावली आहे.
नवीनतम माहितीनुसार, सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मुंबई शाखेच्या सूचनेनुसार, शाहजहानपूर शाखेचे व्यवस्थापक अनुज वर्मा यांनी बांदा येथील अभिनेत्याच्या ‘यादव भवन’ या निवासस्थानी लिलावाची नोटीस लावली आहे. बँकेच्या माहितीनुसार, राजपाल यादव, त्यांची पत्नी राधा यादव आणि आई गोदावरी देवी यांच्यावर बँकेचे एकूण ₹16,61,64,638 चे कर्ज आहे. आणि या मुळे प्लॉट क्रमांक 1410, 1411, 1412 आणि 1413 वरील जमीन आणि घर लिलावाच्या यादीत ठेवण्यात आले आहे. या मालमत्तेचे अंदाजित मूल्य सुमारे ₹3,19,26,000 निश्चित करण्यात आले आहे.
सध्या बँकेची कठोर कारवाई सुरु असुन राजपाल यांचे मोठे भाउ श्रीपाल यादव यांनी माध्यमांना सांगितले की, हे प्रकरण जुने आहे. आणि याबाबत बॅक व्यवस्थापनाशी चर्चा सुरु आहे. आणि लिलावाच्या तारखेपुर्वी दोन्ही पक्षांमध्ये सामंजस्य होईल.
हेही वाचा
‘हुमा कुरेशीचं लग्न कधी होणार?’ अभिनेत्रीने केला स्वतः खुलासा


