राजपाल यादव हा एक लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता आहे. त्याने आतापर्यंत अनेक चित्रपट केले. आणि प्रेक्षकांना ते भावले सुद्धा, त्यांनी साकारलेल्या अनेक भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण करून आहेत, राजपाल यादव हा काही दिवसांपूर्वी चेक बाउन्स या कारणामुळे चर्चेत होता. त्यानंतर त्याची सुटका झाल्यानंतर तो भूत बंगला या चित्रपटात काम केल्याचे दिसले. तर आता अजून एक चित्रपटात तो दिसणार आहे तर ते आता सलमान खानच्या एका चित्रपटात दिसणार आहेत. तर या चित्रपटाचे नाव ‘SVC63’ आहे, जे नंतर बदलले जाऊ शकते.
बॉलिवूड मि़डिया वृत्तानुसार, राजपाल यादव ‘SVC63’ मध्ये सलमान खानसोबत दिसणार आहेत. या चित्रपटात राजपाल सलमान खानच्या राईट हांइडच्या माणसाची भूमिका साकारतील. राजपाल चित्रपटात सलमान खानच्या खास साथीदाराची भूमिका साकारतील आहेत. तर कथानकात त्यांच्यातील एक मजबूत आणि गतिमान नातेसंबंध दाखवला जाईल. ही सर्वात महत्त्वाच्या भूमिकांपैकी एक आहे आणि ही निवड गुणवत्तेच्या आधारावर करण्यात आली आहे. तर हा एक एक्शन चित्रपट आहे.
सलमान खान (khan)आणि राजपाल यादव यांनी यापूर्वीही चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. राजपाल 2005 साली प्रदर्शित झालेल्या ‘मुझसे शादी करोगी’ या चित्रपटात सलमानसोबत दिसला होता. या चित्रपटात राजपालने एका पुजाऱ्याची भूमिका साकारली होती. ज्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. तर आता या दोघाना एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. तर राजपाल यादव आता भुत बंगला चित्रपटानंतर या चित्रपटात दिसतील.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
अक्षय कुमार अभिनीत ‘भूत बंगला’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, चित्रपटाची कमाई 200 कोटींच्या उंबरठ्यावर










