Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘मी भारत सोडला, तर खुलतील बॉलिवूडची गुपीतं’, केआरकेची बॉलिवूडला धमकी

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या ‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’ सिनेमावर केलेल्या टीकेनंतर केआरके म्हणजेच कमाल राशिद खान चर्चेचा विषय ठरत आहे. एका पाठोपाठ एक ट्वीट करून तो सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत आहे. नुकतेच त्याने दावा केला आहे की, बॉलिवूडचे लोक त्याचे शोषण करत आहेत. त्यामुळे त्याला कोणत्याही कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागू नये, यासाठी तो कायमचा भारत देश सोडू शकतो.

केआरकेने ट्विटरवर एकप्रकारे धमकी देत लिहिले की, त्याला खूप जास्त डिवचण्याची आवश्यकता नाहीये. कारण त्याच्याकडे खूप व्हिडिओ आहेत, जे गुपीतं खुली करू शकतात.

त्याने ट्वीट केले, “मी चित्रपटांची समीक्षा न करण्याच्या खूप जवळ होतो. मात्र, मी खूप पुढे गेलो. मी कदाचित यासाठी पुढे गेलो कारण माझ्याकडे आता संघर्ष करण्यासाठी अधिक वय राहिलेले नाही. आता बॉलिवूडचे लोक माझे शोषण करत आहेत. मी एमएफ हुसैन यांच्याप्रमाणे कायमचे भारत सोडू शकतो. मला कोणत्याही कारवाईचा सामना करावा लागणार नाही.”

केआरके एवढंच बोलून थांबला नाही. त्याने आणखी एक ट्वीट केले की, “बॉलिवूडच्या लोकांनी समजले पाहिजे की, न्यायालयाकडून ते मला तेव्हाच रोखू शकतात, जेव्हा मला भारतात यायची इच्छा होईल. एकदा का मी भारत कायमचा सोडला, तर कोणताच कायदा मला चित्रपटाची समीक्षा करण्यापासून अडवू शकणार नाही. जर मी भारत सोडला, तर बॉलिवूडला खूप पश्चाताप होईल. कारण बंधुता संपलेली असेल.” हा वाद अजूनही थांबण्याचे नाव घेत नाहीये. तो दरदिवशी नवीन खुलासे करत आहे.

त्याने पुढे लिहिले की, “यासाठी खूप आवश्यक आहे की, मला चिंतेत टाकू नये. माझ्याकडे खूप व्हिडिओ आणि अनेक गुपीतं आहेत. मी अनेक बॉलिवूडकरांची चड्डी फेडू शकतो. जर मी भारत सोडला, तर मी हे सर्व मोठ्या उत्साहात करेल. मी जे काही म्हणत आहे, ते चांगल्याप्रकारे नोट करून घ्या. मजा करा.”

याव्यतिरिक्त त्याने असेही म्हटले की, “मला चित्रपटांची समीक्षा करण्यात कोणताही रस नाहीये. मात्र, तुम्ही बॉलिवूडकर मला भाग पाडत आहेत.”

सलमान खान आणि केआरकेमधील वाद तेव्हा सुरू झाला, जेव्हा सलमानने त्याच्यावर मानहानीचा खटला दाखल केला. दुसरीकडे केआरकेने म्हटले की, त्याने ‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’ चित्रपटाची समीक्षा केल्यामुळे त्याच्यावर हा खटला दाखल केला. या प्रकरणावर डीएसके लीगलचे विधान होते की, या प्रकरणाचा समीक्षा करण्याशी काही संबंध नाही, परंतु अभिनेत्याला भ्रष्ट म्हणवून आणि त्याच्यावर खोटे आरोप केल्यामुळे हे केले गेले आहे.

यापूर्वी केआरकेने मिका सिंगवरही निशाणा साधला होता. त्यानंतर मिकानेही त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा