कार्तिक आर्यनला प्रसिद्ध दिग्दर्शकाचा पाठिंबा; ट्वीट करून म्हणाले, ‘त्याच्याविरुद्ध कट रचला जातोय आणि…’

Director Anubhav Sinha says there is campaign against kartik Aaryan


बॉलिवूडमध्ये सर्वात वेगाने लोकप्रियतेचे शिखर गाठणारा अभिनेता म्हणजे कार्तिक आर्यन. तो या दिवसात खूप चर्चेत आहे. पण सध्या त्याच्या हातातून एका नंतर एक प्रोजेक्ट निघून चालले आहेत. आधी करण जोहरचा ‘दोस्ताना 2’ नंतर शाहरुखचा ‘फ्रेडी’ आणि आता आनंद एल रायचा प्रोजेक्ट त्याच्या हातातून जात असल्याची चर्चा चालू आहे. परंतु याबाबत कार्तिकने कोणतीच माहिती दिली नाहीये. यातच दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी कार्तिकला आपला पाठिंबा दर्शवला आहे.

त्यांनी असे सांगितले आहे की, कार्तिक आर्यनविरुद्ध कट रचला जात आहे. दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्या वक्तव्यानंतर आता काही युजरने या गोष्टीला सुशांत सिंग राजपूतचा संदर्भ जोडत कमेंट केल्या आहेत.

अनुभव सिन्हा यांनी ट्वीट केले आहे की, “एक गोष्ट सांगू का? जेव्हा एखादा निर्माता त्याच्या चित्रपटातून एखाद्या कलाकारला हाकलतो किंवा कलाकार स्वतः हून तो चित्रपट सोडतो, तेव्हा ते या गोष्टीबाबत जास्त बोलत नाहीत. हे असं नेहमीच होत असतं. मला असं वाटतं की, कार्तिक आर्यनविरुद्ध कट रचला जातोय आणि तो खूप अन्यायकारक आहे. हे खूप चुकीचं आहे. तो गप्प बसला आहे आणि त्या गोष्टीचा मी सन्मान करतो.”

सोशल मीडियावर अनेक युजरने अनुभव सिन्हाचे समर्थन केले आहे, तर काहीजण या गोष्टीला सुशांत सिंगसोबत जोडत आहेत. त्यांचे असे म्हणणे आहे की, सुशांत सिंगसोबत देखील असेच घडले होते.

त्यांच्या या ट्विटवर एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “आता सुशांतनंतर कार्तिक का?” दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे की, “आधी सुशांत सिंगसोबत देखील असेच झाले आहे. करण जोहर हा बॉलिवूडमधील सर्वात मोठा शार्क आहे. आता कंगना रणौतने जेव्हा या विरुद्ध आवाज उठवला, तेव्हा तिला शांत केले.”

कार्तिकने 2011 मध्ये ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने ‘कांची द अनब्रेकेबल’, ‘सोनू के टिटू की स्विटी’ , ‘लुका छुप्पी’, ‘पती पत्नी और वो’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच तो लवकरच त्याच्या ‘भूल भुलैया’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत ‘कियारा आडवाणी’ ही देखील असणार आहे. या सोबतच तो ‘धमाका’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तो एका पत्रकाराची भूमिका निभावताना दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.