‘दयाळू असणे हा वाईट विचार नाहीये’, अनन्या पांडेने फेसपॅक लावून केला मिरर सेल्फी शेअर; चाहत्यांनी उधळली स्तुतीसुमने

Bollywood actress Ananya Panday share her mirror selfie on social media


बॉलिवूडमधील इतर अभिनेत्रींप्रमाणेच अनन्या पांडे देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे फोटो शेअर करून तिच्या चाहत्यांना तिच्याशी जोडून ठेवण्याची एकही संधी ती सोडत नाही. तिच्या चाहत्यांना तीचे फोटो आणि व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात आवडतात. ते तिच्या फोटोला नेहमीच पसंती दर्शवत असतात. नुकतेच तिने आरश्यासमोर एक सेल्फी काढून तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे. या फोटो दिलेले कॅप्शन तिच्या चाहत्यांना आकर्षित करत आहे.

अनन्या पांडेने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एका आरश्यासमोरील सेल्फी शेअर केला आहे. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने चेहऱ्याला फेसपॅक लावला आहे. हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “दयाळू असणे हा कधीच वाईट विचार नाहीये. (खास करून स्वत: साठी तर नाहीच)”

अनन्याने जे कॅप्शन या फोटोला दिले आहे तेच तिच्या मोबाईलच्या बॅक कव्हरवर देखील लिहिले आहे. या फोटोमध्ये तिने केसांना हेअर बेल्ट लावला आहे. तिचा हा फोटो आणि कॅप्शन तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहे. तिचे चाहते फोटोवर कमेंट करून तिच्यावर स्तुतीसुमने उधळत आहेत, तर काहींना तिचा विचार आवडला आहे. अनेकजण तिला ट्रोल करण्याचाही प्रयत्न करत आहेत.

अनन्या पांडेला चित्रपटसृष्टीत येऊन नुकतेच दोन वर्ष पूर्ण झाले आहेत. याबाबत बोलताना तिने सांगितले होते की, “हा खूपच सुंदर प्रवास होता. माझं स्वप्न साकार होताना पाहून मला खूप गर्व होत आहे. मी प्रेमाशिवाय आणि उत्साहाशिवाय इथे नसले असते. सर्वांनी दिलेल्या सल्ल्याबद्दल मी आभारी आहे.”

अनन्या पांडेच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती लवकरच तिच्या आगामी ‘लायगर’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत ‘विजय देवरकोंडा’ देखील असणार आहे. या सोबतच ती ‘शकुन बत्रा’ यांच्या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी असणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.