सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्रींपैकीच एक आहे सर्वांची लाडकी शालू, म्हणजेच अभिनेत्री राजेश्वरी खरात. ती सतत तिचे नवनवीन फोटोशूट किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत राहते. तिच्या सर्व पोस्ट चाहत्यांकडूनही पसंत केल्या जातात. मात्र असेही काही युजर्स आहेत, जे तिला ट्रोल करतात. कलाकाराने ट्रोल होणे, ही काही नवीन गोष्ट नाही. काही कलाकार ट्रोलिंगवर गप्प राहणे पसंत करतात. तर याउलट काही कलाकार ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देतात. राजेश्वरीनेही असेच काहीसे केले आहे, ज्यामुळे ती आता चर्चेत आली आहे.
राजेश्वरीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्याद्वारे ती ट्रोलर्सला बाहेरचा रस्ता दाखवताना दिसली आहे. तुम्ही पाहू शकता की, या व्हिडिओवर लिहिले आहे, “जे नकारात्मक कमेंट्स आणि ट्रोल करतात त्या सर्वांसाठी.” त्यानंतर ती एका म्युझिकवर डान्स करत, बाहेर जाण्याचा इशारा करते.
हा व्हिडिओ शेअर करून तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “हा हा हा..पण तरीही मी तुम्हा सगळ्यांवर प्रेम करते.” राजेश्वरीच्या या व्हिडिओही नेटकऱ्यांकडून चांगलीच पसंती मिळत आहे. खूप कमी वेळात व्हिडिओवर ८ हजारहून अधिक लाईक्स आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे हा व्हिडिओ शेअर करून, शालूने ट्रोल करणाऱ्यांच्या तोंडावर चांगलीच चापट दिली आहे.
राजेश्वरीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले, तर तिचा जन्म ८ एप्रिल १९९८ रोजी पुण्यात झाला होता. कुटुंबात ती तिच्या पालकांसोबत राहते. तिचे वडील एका बँकेत काम करतात. तसेच तिने पुण्याच्या जोग एज्युकेशन ट्रस्टमधून शालेय शिक्षण घेतले. बारावी पूर्ण झाल्यानंतर तिने सिंहगड कॉलेज, पुणे येथून बी.कॉम मध्ये पदवी मिळवली.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…