भोजपुरी सिनेमा ‘मजनुआ’च्या दमदार ट्रेलरचा यूट्यूबवर राडा! अल्पावधितच लाखो व्ह्यूजचा टप्पा पार

bhojpuri superstar ritesh pandey akshara singh bhojpuri film majanuaa trailer release on youtube ashas


सध्या प्रादेशिक सिनेमांना सुगीचे दिवस आले आहेत. अनेकविध भाषांचे वेगवेगळे सिनेमे देशातील प्रेक्षकांना भुरळ घालण्यात बऱ्याचदा यशस्वी होत असतात. अशी अनेक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतील. मागील काही काळापासून भोजपुरी सिनेमे आणि गाणे तुफान गाजत आहेत. या सिनेमांचा प्रेक्षकवर्ग देखील खूप मोठा आहे. त्यामुळे भोजपुरीमध्ये येणाऱ्या चित्रपटांबद्दल रसिकांना नेहमीच उत्सुकता असते. या कोरोनाच्या काळात सिनेमागृह बंद असले, तरी अनेक सिनेमांचे ट्रेलर प्रदर्शित केले जात आहेत. यातले काही सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीझ झाले.

नुकताच ‘मजनुआ’ या भोजपुरी सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. लोकप्रिय अभिनेता आणि गायक असलेला रितेश पांडे आणि प्रसिद्ध अभिनेत्री अक्षरा सिंग यांचा हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित होताच यूट्यूबवर खूप पहिला जात असून, ट्रेलरला रसिकांच्या पसंतीची पोचपावती मिळत आहे. रितेश पांडे आणि अभिनेत्री अक्षरा सिंग या जोडीने याआधी देखील सोबत काम केले आहे.

त्यांचा पहिला सिनेमा ‘राजा राजकुमार’ हा तुफान हिट झालेला चित्रपट होता. आता ही जोडी पुन्हा ‘मजनुआ’ सिनेमाच्या निमित्ताने एकत्र येत आहे. या सिनेमाचा ट्रेलर आटुश्या दमदार असून, सुंदर गाणी, जबरदस्त ऍक्शन, प्रेम, भावना आणि दमदार संवाद यांमुळे हा ट्रेलर यूट्यूबवर गाजत आहे. एकाच सिनेमात सर्व पाहायला मिळत असल्याने प्रेक्षक आनंदित आहे. या सिनेमाची निर्मिती जगत बिहारी तर दिग्दर्शन आशिष यादव यांनी केले आहे.

या सिनेमाचा ट्रेलर एंटर १० रंगीला या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झाला आणि खूपच कमी वेळात ट्रेलरला लाखो व्हियूज मिळाले आहेत. या ट्रेलरवर प्रेक्षकांच्या देखील कमेंट्स येत असून, सिनेमा नक्कीच यशस्वी होणार असा विश्वास व्यक्त होत आहे. या चित्रपटाची शूटिंग मुंबई आणि उत्तरप्रदेशमध्ये झाली असून, या सिनेमात रितेश पांडे आणि अभिनेत्री अक्षरा सिंग सोबतच सुशील सिंग, देव सिंग, बिपिन सिंग, प्रकाश जैस आदी कलाकार महत्वाची भूमिका निभावताना दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.