‘कधी मुलगी पहिली नाही का?’ म्हणत राखी सावंतने रस्त्यावरील एका व्यक्तीला चांगलेच सुनावले; व्हिडिओ व्हायरल

Rakhi Sawant's video viral on social media, while arguing with stranger


‘बिग बॉस’ फेम आणि बॉलिवूडमध्ये ‘ड्रामा क्वीन’ या नावाने प्रसिद्ध असणारी अभिनेत्री म्हणजे राखी सावंत. सध्या लॉकडाऊनमुळे सगळे कलाकार घरातच आहेत. तरीही ते वेगवेगळ्या प्रकारे मनोरंजन करत असतात. पण लॉकडाऊन असतानाही राखी सावंत अनेक वेळा रस्त्यावर स्पॉट झाली आहे. यामुळे ती सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. आता देखील राखी सावंतचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये राखी एका कारच्या बाहेर उभी आहे आणि एक मुलाखत देत आहे. तेवढ्यात तेथून जाणारा एक व्यक्ती जातो आणि पुढे जाऊन तिच्याकडे वळून बघतो. यावर राखी त्याला समोर बघून चालायला सांगते. यामध्ये ती म्हणते की, “काका तुम्ही जा ना, मी मुलाखत देत आहे. असे काय बघताय.”

या नंतर राखी म्हणते की, “मुलगी कधी पहिली नाही का? एवढं बघताय… पुढे बघून चाला.” या व्हिडिओमध्ये तिने कलरफुल ड्रेस घातला आहे. केस मागे बांधले आहेत. तिचे चाहते हा व्हिडिओ वेग वेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत.

राखीने ‘बिग बॉस 14’ मध्ये तिच्या वागण्याने आणि विनोदाने प्रेक्षकांच्या मनात वेगळेच स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे तिच्या फॅन फॉलोविंग मध्ये खूप वाढ झाली आहे. यांनतर तिचे अनेक व्हिडिओ सारखेच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. याआधी देखील राखीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये तिची एक छोटी चाहती तिच्याकडे सेल्फी मागते तेव्हा राखी तिला भररस्त्यात डान्स करायला लावते ती देखील तिच्या सोबत ठुमके मारते. हा डान्स झाल्यानंतर ती तिला सेल्फी देते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.