प्रसिद्ध टीव्ही अभिनेता पर्ल वी पुरी सध्या अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या आरोपामुळे तुरुंगात आहे. त्याच्यावर लावलेल्या आरोपांना टीव्ही इंडस्ट्रीतील एकता कपूर, दिव्या खोसला कुमारसह इतर अनेक कलाकारांनी खोटे असल्याचे म्हटले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकार त्याच्यासाठी न्याय मागत आहेत. अशामध्ये पीडित मुलीच्या कुटुंबाकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. ज्यात पर्ल निर्दोष असल्याचे सांगितले आहे. इतकेच नाही, तर या निवेदनात असेही म्हटले आहे की, मुलीची आईसुद्धा पर्लला पाठिंबा देत आहे. त्याला फसवले जात आहे, जेणेकरून यानंतर मुलीची कस्टडी पतीला मिळू शकेल.
पीडितेच्या कुटुंबाकडून सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. त्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “पीडितेच्या आईकडून आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, ती मागील १० वर्षांपासून आपल्या विवाहित आयुष्यातील खूप वाईट काळातून जात आहे. मागील दोन वर्षांपासून तिची मुलगीही तिच्याकडे नाहीये. पीडितेच्या आईसोबत आम्हीही पर्ल वी पुरीला पाठिंबा देत आहोत आणि अपेक्षा करतो की, त्याला लवकरच न्याय मिळेल. पीडितेची आई आपल्या मुलीच्या कस्टडीसाठी खूप वर्षांपासून लढत आहे. अशामध्ये आता तिच्या पतीने हा कट रचत आरोप लावले आहेत. जेणेकरून तो न्यायालयीन व्यवस्थेसमोर पीडितेच्या आईची प्रतिमा मलीन करू शकेल आणि त्यामुळे आईला मुलीची कस्टडी मिळणार नाही.”
https://www.instagram.com/p/CP0k_KKpZBX/?utm_source=ig_web_copy_link
“ती अतिशय वाईट पद्धतीने घाबरली आहे. तिला तुमचा पाठिंबा पाहिजे. ती स्वत: पर्ल वी पुरीचे समर्थन करत आहे. कारण तो निर्दोष आहे. तिला माहिती आहे की, अभिनेत्याला जबरदस्ती फसवले जात आहे. हे सर्व पीडितेच्या वडिलाकडून करण्यात आले आहे. पीडितेच्या वडिलांनी लिहिलेली ही खराब पटकथा आहे. आम्हाला विश्वास आहे, सत्य नक्कीच बाहेर येईल. जितके समर्थन पर्लला हवे आहे, तितकेच समर्थन पीडितेच्या आईलादेखील हवे आहे,” असेही या निवेदनात म्हटले आहे.
खरं तर पर्ल जवळपास मागील एका आठवड्यापासून तुरुंगात आहे. अभिनेत्यावर आरोप लावण्यात आला आहे की, टीव्ही इंडस्ट्रीत काम करण्याच्या बहाण्याने त्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. मात्र, पर्लच्या समर्थनार्थ आलेल्या कलाकारांनी हा आरोप पूर्णपणे खोटा असल्याचे सांगितले आहे. पर्लला फसवले जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-मोठी बातमी! भोजपुरी सुपरस्टार खेसारी लाल यादववर गुन्हा दाखल; महिलांबद्दल अश्लील गाणे बनवल्याचा आरोप