मोठी बातमी! भोजपुरी सुपरस्टार खेसारी लाल यादववर गुन्हा दाखल; महिलांबद्दल अश्लील गाणे बनवल्याचा आरोप


भोजपुरी चित्रपट आणि संगीत क्षेत्रातील सुपरस्टार खेसारी लाल यादवने आपली एक वेगळीच ओळख मिळवली आहे. संगीताबद्दल बोलायचं झालं, तर त्याची गाणी रिलीझ होताच व्हायरल होऊ लागतात. त्याची काही गाणी अशी असतात, ज्यामुळे त्याला वादाचा सामना करावा लागतो. असेच काहीसे त्याच्यासोबत झाले आहे. खेसारी लालविरुद्ध मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर महिलांवर अश्लील गाणे बनवल्याचा आरोप लावला आहे.

खेसारी लालवर भारतीय दंड संहितेच्या २९२, २९४ आणि ३५४ या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सनातन सेवा फाऊंडेशनचे प्रमुख श्री सुजीत सिंग यांनी मुंबईत खेसारी लालविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यावर असा आरोप आहे की, पैसे कमावण्यासाठी तो आपल्या गाण्यातून अश्लीलता पसरवतो. त्यांनी आपल्या तक्रारीत खेसारी लालचे ‘चाची के बाची सपनवां में आती है’ या गाण्याचे उदाहरण दिले आहे. सुजीत यांनी खेसारी लालविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

खेसारी लाल भोजपुरी सिनेमातील एक मोठं नाव आहे. त्याने खूप संघर्षानंतर हे स्थान मिळवले आहे. खेसारी लालचा जन्म बिहारच्या सिवान जिल्ह्यात झाला आहे. तो ‘बिग बॉस १३’मध्ये झळकला होता. तिथे त्याला चाहत्यांकडून चांगली पसंती मिळाली. मात्र, लवकरच तो शोमधून बाहेर झाला. खेसारी लालने आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘साजन चले ससुराल’ चित्रपटाने केली होती.

अवघ्या ११ हजार रुपयांनी कारकिर्दीची सुरुवात करणारा खेसारी लाल आज भोजपुरी चित्रपटसृष्टीतील महागडा अभिनेता आहे. खेसारी लालची सर्वाधिक कमाई चित्रपट आणि स्टेज शोद्वारे होते. त्याच्या प्रत्येक शोला चाहते गर्दी करत असतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ये परदा हटा दो’ गाण्यावरील मानसी नाईकच्या एक्सप्रेशन्सवर तिचा पतीही झाला फिदा; कमेंट करत म्हणतोय, ‘ये चांद…’

-उर्वशीच्या पोटात एका व्यक्तीने दणादण मारल्या बुक्क्या; त्रास होत असूनही अभिनेत्रीने गपगुमान केले सहन

-जेनेलियासोबत रितेश करत होता रोमान्स; तिचा हात समजून केले ‘या’ दिग्दर्शकाच्या हातावर किस, पुढं काय झालं पाहाच…


Leave A Reply

Your email address will not be published.