‘ये परदा हटा दो’ गाण्यावरील मानसी नाईकच्या एक्सप्रेशन्सवर तिचा पतीही झाला फिदा; कमेंट करत म्हणतोय, ‘ये चांद…’


मराठी सिनेसृष्टीत आपल्या नृत्यकेलेने प्रेक्षकांना वेड लावणारी मानसी नाईक तर आपणा सर्वांना ठाऊकच आहे. एकापेक्षा एक भन्नाट गाण्यांवर डान्स करून तिने प्रेक्षकांच्या मनात आपली छाप सोडली आहे. आपल्या मनमोहक अदांनी रसिकांना घायाळ करणारी ही अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. एकापेक्षा एक जबरदस्त फोटो आणि व्हिडिओ शेअर करून, ती नेहमीच चर्चेचा विषय बनते.

अलीकडेच मानसीने पोस्ट केलेला एक व्हिडिओ, चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. यामध्ये तिने ‘ये परदा हटा दो’ या गाण्यावर अभिनय केला आहे, जो चाहत्यांना खूप आवडला आहे. व्हिडिओमधील मानसीचे एक्सप्रेशन्स अगदी पाहण्यासारखे आहेत. शिवाय यात अभिनेत्री टॉमबॉय लूकमध्ये दिसली आहे. तुम्ही पाहू शकता की, तिने शर्टसह रीप्ड जीन्स परिधान केली आहे.

‘ये परदा हटा दो’ या प्रसिद्ध गाण्यावरील मानसीचा अभिनय नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “एक हम हैं जो इश्क़ कि बारिश करते है, एक वह हैं जो भीगने को तैयार ही नहीं…” व्हिडिओ सोबतच हे खास कॅप्शन युजर्सचे लक्ष वेधून घेत आहे. व्हिडिओवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया उमटत आहे, तर मानसीचा पती प्रदीप खरेरानेही या व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. व्हिडिओखाली कमेंट करत त्याने लिहिले की, “ये दिन दिन को कभी उपहार नहीं दिया करता, ये फूल फूल को कभी उपहार नहीं दिया करता, चाहत तो मेरी तुझे चांद तोड कर देने की है, लेकिन चांद चांद को कभी उपहार नहीं दिया करता.” प्रदीप खरेराची प्रेमाने भरलेली कमेंट देखील चाहत्यांना चांगलीच भावली आहे.

मानसी नाईकने २००७ साली ‘जबरदस्त’ या मराठी चित्रपटाद्वारे चित्रपट क्षेत्रात प्रवेश केला होता. ईटीव्ही मराठी या दूरचित्रवाहिनीवरून प्रसारित होणार्‍या ‘चार दिवस सासूचे’ या मालिकेतील मुख्य नायिकेची तिने साकारलेली भूमिका विशेष गाजली. तसेच, ‘वाट बघतोय रिक्षावाला’ आणि ‘बाई वाड्यावर या’ या गीतांनी तिला विशेष ओळख मिळवून दिली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कियारा आडवाणीचा बिकिनीतील व्हिडिओ घालतोय सोशल मीडियावर धुमाकूळ, करतेय ‘या’ गोष्टीला मिस

-आहा कडकच ना! ‘लुट गए’ गाण्यावर पोरीचा जबरदस्त डान्स, मिळाले १ कोटीपेक्षाही अधिक व्ह्यूज

-नादच खुळा! यूट्यूबर शिरुश्रीने केला धमाकेदार ‘शिव तांडव’ डान्स; पाहून तुमचेही थिरकतील पाय


Leave A Reply

Your email address will not be published.